man marries 53 women in 43 years, अरे देवा! ४३ वर्षात ५३ लग्न केली, कारण ऐकून हैराण व्हाल… – weird news man marries with 53 women in just 43 years to find peace( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: सौदी अरेबियामध्ये एका व्यक्तीने ४३ वर्षांत ५३ वेळा लग्न करण्याचा वेगळाच विक्रम केला आहे. या विवाहांमागील कारण स्पष्ट करताना त्या व्यक्तीने सांगितले की, ‘शांतता आणि स्थिरता’ मिळवण्यासाठी त्याने ही लग्न केलीत. लग्नाच्या या विक्रमानंतर ६३ वर्षीय व्यक्तीन अनेक लग्न करण्यामागचे कारण सांगितले आहे, जे ऐकून सगळेच थक्क झाले. त्या व्यक्तीचे म्हणणे आहे की, त्याला आनंदी ठेवू शकेल अशा मुलीच्या शोधात त्याने हे ४३ लग्न केले.

गल्फ न्यूजमधील एका बातमीनुसार, अबू अब्दुल्ला असे या व्यक्तीचे नाव आहे. आपली कहाणी सांगताना अबूने म्हटले आहे की, ‘जेव्हा मी पहिले लग्न केले तेव्हा दुसरे लग्न करण्याचा माझा कोणताही विचार नव्हता. त्यावेळी मला खूप आनंद झाला आणि आम्हाला एक मूलही झाले. यानंतर त्या व्यक्तीने वयाच्या २३ व्या वर्षी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. कारण, त्याला त्याच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत होत्या. ती व्यक्ती म्हणाली की ती आपल्या सर्व पत्नींशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो.

हेही वाचा -समुद्रात वाहून गेलेल्या पत्नीचा आला व्हॉइस मेसेज; ‘मी रवीसोबत आनंदी आहे’…

भांडणामुळे विवाह

त्या व्यक्तीने सांगितले की त्याच्या आणि त्याच्या पत्नींमध्ये अनेक समस्या होत्या. हेच कारण त्याला वारंवार लग्न करण्यासाठी उकसवत होते. ते म्हणाले, ‘मी ५३ महिलांशी लग्न केले आहे. माझे पहिले लग्न मी फक्त २० वर्षांचा असताना झाले होते आणि माझी पत्नी माझ्यापेक्षा ६ वर्षांनी मोठी होती. त्या व्यक्तीने सांगितले की, त्याने ही लग्न नियोजन करुन केले नाही. पत्नीच्या त्रासाला कंटाळून त्याला प्रत्येक वेळी मजबुरीमध्ये हा निर्णय घ्यावा लागला.

हेही वाचा – तीन कोटी रोख, ५० किलो सोनं, १३ काडतुसं, पाहा महंत नरेंद्र गिरींच्या खोलीत काय-काय सापडलं

यापुढे लग्न करणार नाही

अब्दुल्ला यांनी सांगितले की, त्यांच्या लग्नाचा सर्वात कमी काळ हा वन नाईट इव्हेंट होता. तो म्हणाला, त्याचे बहुतेक विवाह सौदी महिलांसोबत झाले आहेत. ‘मीही काही परदेशी महिलांशी लग्न केले आहे.’ परदेशी भूमीवर कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून त्याने हे केल्याचे त्या व्यक्तीचे म्हणणे आहे. मात्र, आता अब्दुल्लाने पुन्हा लग्न न करण्याचा विचार करणार नाही.

हेही वाचा -बाळाने ‘त्याला’ पप्पा म्हणावं की दादा? पाहा ही महिला काय करुन बसलीये…

आंतरजातीय विवाहानंतर पतीसह मुलाचंही निधन; प्रियांकाची संघर्षमय यशोगाथा

Related posts