dangerous smartphone apps delete immediately

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Gaming Apps:  सध्याच्या काळात जवळजवळ प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो आणि प्रत्येक स्मार्टफोन यूजर त्याच्या सोयीनुसार आणि गरजेनुसार त्याच्या डिव्हाईसमध्ये विविध स्मार्टफोन अ‍ॅप्स डाउनलोड करतो. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, FIFA आणि PUBG सारख्या अतिशय लोकप्रिय अ‍ॅप्सपासून तुम्हाला दूर राहावे लागेल आणि तुम्ही ती चुकूनही फोनमध्ये डाउनलोड करू नका. (dangerous smartphone apps delete immediately)

हे अॅप्स काय आहेत, या अॅप्समुळे कोणत्या धोकादायक गोष्टीला सामोरे जावे लागेल, तसेच तुम्हाला कोणते नुकसान सोसावे लागू शकते, याबाबत तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. 

PUBG आणि FIFA डाउनलोड करू नका

Kaspersky च्या एका अहवालात असे म्हटले आहे की, असे 28 गेम अॅप्स आहेत जे लोकप्रिय आणि अत्यंत धोकादायक आहेत. यामध्ये मालवेअर, Redliner ने प्रभावित आहेत. 3 लाखांहून अधिक वापरकर्त्यांना याचा फटका बसला आहे. या अॅप्समध्ये PUBG आणि FIFA सोबत Roblox आणि Minecraft सारख्या नावांचा समावेश आहे.

मोठे नुकसान सहन करावे लागेल

अहवालात असे म्हटले आहे की, हा व्हायरस 2020 मध्ये आढळला होता आणि सध्या ब्राउझर, ftp क्लायंट आणि डेस्कटॉप व्यवस्थापकांकडून पासवर्ड चोरणाऱ्या सर्वात सामान्य ट्रोजनपैकी एक आहे.  हा वायरस सहजपणे थर्ड पार्टी प्रोग्राम डाउनलोड करून सहजपणे करू शकतो. डीफॉल्ट ब्राउझरमध्ये Linux चालवू आणि उघडू शकतो.

तसेच Keyboard वर type केलेला कोणताही डेटा track करू शकतो आणि screenshot देखील घेऊ शकतो. अहवालात असेही म्हटले आहे की, घोटाळेबाज बनावट पेज तयार करण्यासाठी आणि लोकांची फसवणूक करण्यासाठी आवडत्या गेमच्या इंटरफेसची कॉपी करत आहेत.

Related posts