signs of marriage material husband, पुरूषहो, बॉयफ्रेंड कोणीही चालेल पण नवरा बघताना या गोष्टी नोटीस करतात मुली, 3 नंबरवरील मुली सहजासहजी पटणं अशक्यच – every girl wants these qualities in her future husband which she looks for in every man before marriage( प्रगत भारत । pragatbharat.com)

लग्न म्हणजे एक मोठा निर्णय असतो ही गोष्ट कोणीच नाकारणार नाही. ज्या एका निर्णयानंतर मुलगा आणि मुलगी दोघांचे आयुष्य बदलून जाते. आजवर ते एकटे जगत आलेले असतात. पण यापुढे त्यांना एकमेकांना सोबत घेऊन जगायचं असतं. अशावेळी जर चांगला पार्टनर मिळाला तर साहजिकच नाते निभावणे सोपे होऊन जाते. पण जेव्हा चुकीचा पार्टनर निवडला जातो तेव्हा मात्र त्या नात्यात राहणे एखाद्या नरकात राहण्या;पेक्षा कमी नसते.

म्हणूनच खूप गरजेचे आहे की तुम्ही ज्या कोणत्या व्यक्तीची लग्नासाठी निवड कराल तो तुम्हाला सांभाळून आणि समजू घेणारा असेल. केवळ मुलींनाच नाही तर मुलांना सुद्धा ही गोष्ट लागू होते. आज आपण जाणून घेणार आहोत की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या मुली आपल्या होणा-या नवऱ्यामध्ये शोधत असतात. याच्या मदतीने तुम्ही आवडती मुलगी सहज पटवू शकता.

काहीतरी करण्याची जिद्द हवी

बहुतांश स्त्रियांना असा पार्टनर हवा असतो ज्याला आयुष्यात काहीतरी करायचे असते. जे जीवन जगतो आहे ते तसेच जगत न राहता काहीतरी वेगळे करून सुख, समृद्धी प्राप्त करण्याची इच्छा मनी बाळगणारे पुरूस स्त्रियांना हवे असतात. शिवाय असे पुरुष आपल्या पत्नीच्या सुखासाठी आणि तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी देखील झटत असतात. यावर स्त्रियांचे म्हणणे आहे की जेव्हा आपला पती आपल्यासाठी खूप मेहनत करत झटत असतो आणि ती गोष्ट आपल्याला दिसते तेव्हा त्याच्या विषयीचे प्रेम अधिक वाढते.

(वाचा :- माझी कहाणी : मी ज्या मुलीवर आकंठ प्रेम केलं ती माझी वहिणी बनणार आहे, भावाने माझं प्रेम व पत्नी दोन्ही हिरावलं..)

लोकांमध्ये मिसळणारा

आपला पती हा एकलकोंडा नसावा तर सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारा असावा असे स्त्रियांना वाटते. आणि अशी हसतमुख असणारी लोक इतरांना सुद्धा आवडतात. असा लोकांमध्ये मिसळणारा नवरा असेल तर साहजिकच त्याची अन्य लोक कौतुक करतात, स्तुती करतात आणि ती स्तुती ऐकायला सुद्धा स्त्रियांना खूप आवडते. शिवाय असे पुरूष हे आत्मविश्वासाने भरलेले असतात आणि म्हणूनच स्त्रियांना वाटते की आपला नवरा सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारा असावा.

(वाचा :- सचिन तेंडूलकर व अंजलीची लवस्टोरी ऐकून भारावाल, क्रिकेटचा ‘क’ माहिती नसणा-या मुलीसमोर का विरघळला क्रिकेटचा देव?)

भावना व्यक्त करणारा

आपल्या पतीने आपल्या मनातील भावना व्यक्त कराव्यात ही इच्छा तर प्रत्येक स्त्रीची असते पण पुरुषी स्वभाव सहसा असा असतो की त्यांना अशा भावना व्यक्त करता येत नाहीत. पण स्त्रियांना आपल्या नवऱ्याच व्यक्त होणे आवडते. त्याने दाखवलेले प्रेम आवडते. यातून त्यांच्या मनात सुद्धा पती बद्दलची आपुलकी आणि आकर्षण वाढत जाते. ही क्वालिटी ज्या पुरुषात असेल तो स्त्रियांमध्ये थोडा फेमस देखील असतो बरं का!

(वाचा :- पार्टनरच्या झोपण्याच्या स्टाइलवरून ओळखू शकता त्याची पर्सनॅलिटी व स्वभाव, बघा या टेस्टमधून जुळतं का तुमचं नातं.!)

वागण्याची पद्धत

आपल्या होणाऱ्या नवऱ्याची वागण्याची पद्धत नेमकी कशी आहे याकडे स्त्रिया बारकाईने लक्ष देतात. त्याने सर्वांशी प्रेमाने वागावे आणि आपुलकीने सगळ्यांची चौकशी करावी असे त्यांना वाटते. यातून नवऱ्याची होणारी स्तुती ऐकायला देखील स्त्रियांना आवडते. शिवाय असे पुरुष हे आपल्या बायकोला जास्त समजून घेऊ शकतात असे स्त्रियांना वाटते. असे पुरूस स्वत: नमते घेऊन आपल्या बायकोचा रुसवा काढण्यात देखील माहिर असल्याने आपल्या नवऱ्यात ही क्वालिटी हवी अशी अपेक्षा स्त्रिया करतात.

(वाचा :- माझी कहाणी : मी 26 वर्षांची मुलगी आहे व मला लग्न करायचं आहे, पण समाज माझ्या लग्नाला तुच्छ व पाप मानतो कारण…!)

फ्युचर प्लानिंगवर लक्ष

एखादा तरुण आपल्या भविष्याबद्दल नक्की काय विचार करतो याकडे स्त्रिया खास लक्ष देतात. जर एखाद्या तरुणात त्यांना इंटरेस्ट असेलच तर त्या भविष्या बाबतचे प्रश्न विचारून मगच पुढचे पाउल उचलतात. शिवाय केवळ शब्दांनी प्लानिंग नको तर ते कृतीतून सुद्धा दिसले तर बायका अधिक खुश होतात आणि आपली निवड चुकली नाही याचे त्यांना समाधान वाटते. तर असे आहेत हे काही गुण जे प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्यात असावे असे वाटतात.

(वाचा :- माझी कहाणी : स्विमिंग कोच फ्लर्ट करतो व मलाही ते खूप आवडतं, पण आमच्यामध्ये एक समस्या आहे जी कधीच संपू शकत नाही)

Related posts