पुणे : फाटकात अडकलेल्या श्वानाची अग्निशमन दलाकडून सुटका | A dog stuck in a gate was rescued by the fire brigade pune print news amy 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

लोखंडी फाटकातील जाळीत अडकलेल्या श्वानाची अग्निशमन दलाकडून सुटका करण्यात आली. भवानी पेठेत ही घटना घडली.भवानी पेठेत एका बंगल्यातील लोखंडी फाटकाच्या जाळीत श्वान अडकले होते. श्वानाचे तोंड जाळीत अडकल्यानंतर नागरिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना दिली.

हेही वाचा >>> पुणे- चांदणी चौकातील सेवारस्त्यासाठी पाच मिळकतींचे भूसंपादन

अग्निशमन दलाचे प्रभारी अधिकारी प्रशांत गायकर, राजू शेलार, मंगेश मिळवणे, कोकरे, गाडे, सोनवणे, जाधव, जकुने आदींनी कटरचा वापर करुन जाळी तोडली. जाळीत अडकलेल्या श्वानाची सुटका करण्यात आल्याने नागरिकांनी जवानांच्या कामगिरीचे कौतुक केले.Related posts