Ravi Bishnoi Reaction on Arshdeep Singh Catch Drop in India Vs Pakistan Match Asia Cup 2022; Marathi News( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक २०२२ मध्ये, टीम इंडियाला पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-४ सामन्यात पाच विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. त्या सामन्यात अर्शदीप सिंगने महत्त्वाच्या प्रसंगी आसिफ अलीचा कॅच सोडला होता, त्यानंतर तो मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला होता. विशेषत: सीमेपलीकडील काही लोकांनी या वेगवान गोलंदाजाला ट्रोल करत खलिस्तानशीही त्याने कनेक्शन जोडले होते.

अर्शदीप सिंगने कॅच सोडली आणि मॅच गेली

भारत आणि पाकिस्तान (Pakistan) विरुद्धच्या चुरशीच्या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने (Captain Rohit Sharma) रवी बिश्नोईला १८ वे षटक टाकण्यास सांगितले. रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) या सामन्यात चांगली गोलंदाजी करत होता आणि त्याने १८ व्या षटकातही अशीच कामगिरी केली. त्यानंतर पाकिस्तानचे दोन नवे फलंदाज मैदानात उतरले. पण, त्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) पाकिस्तानी फलंदाज आसिफ अलीचा कॅच सोडला आणि भारताने हातातली मॅच गमावली. यानंतर आशिफ अलीने ८ चेंडूत १६ धावा करत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

हेही वाचा -मोक्याच्या क्षणी झेल सुटला, अन् कधीही विसरता न येणाऱ्या त्या २ ओव्हर, अन्यथा भारताने मॅच जिंकली असती

आता टीम इंडियाचा युवा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई याने अर्शदीप सिंगच्या कॅच सोडण्यावर वक्तव्य केले आहे. २२ वर्षीय रवी बिश्नोई म्हणतो की, आशिया चषकादरम्यान पाकिस्तानविरुद्ध महत्त्वाचा कॅच सोडणाऱ्या अर्शदीप सिंगच्या जागी तो असू शकला असता. बिश्नोईने त्या सामन्यात चार षटकांत २८ धावा देऊन एक विकेट मिळवला होता. T20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात बिश्नोईला स्थान मिळू शकले नाही, कारण त्याच्याजागी युजवेंद्र चहलला संधी मिळाली.

हेही वाचा -सौरव गांगुलीचे स्वप्न बेचिराख करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न, आयसीसीच्या शर्यतीसाठी उमेदवार तयार

२०२२ मध्ये भारतासाठी १० T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या बिश्नोईने पीटीआयला सांगितले की, ‘तो माझा चांगला मित्र आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की कॅच सुटणे हा खेळाचा एक भाग आहे. हे सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या बाबतीतही घडू शकते. असंही होऊ शकलं असतं की त्याने गोलंदाजी केली असती आणि मी कॅच सोडला असता. अर्शदीप हा मजबूत खेळाडू आहे. कॅच सोडल्यानंतरही त्याने डेथ ओव्हर्समध्ये किती चांगली गोलंदाजी केली. तो अजिबात चिंतीत दिसत नव्हता. तो मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे.

हेही वाचा -शाहिद आफ्रिदीकडून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पोलखोल, म्हणतो आमच्या खेळाडूंना….

अर्शदीप सिंग

Related posts