Weather Update Today IMD predicts more rainfall in Feb Cold wave intensifies in Delhi after spell of rain marathi news



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update Today IMD Forecast : देशाच्या काही भागात पावसाची हजेरी (Rain Update) पाहायला मिळाली आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारपासून पावसाने हजेरी लावली आहे. दिल्लीच्या काही भागात खूप दाट धुके पाहायला मिळणार आहे. हरियाणा, राजस्थान, पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा या वेगवेगळ्या भागात दाट धुके तर, पश्चिम बंगालच्या काही भागात मध्यम धुके पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, शुक्रवारी वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी झाल्यामुळे हवामानावर परिणाम होणार नाही. त्यामुळे हवामानात कायम राहण्याचा अंदाज आहे.

देशातील हवामान कायम राहण्याचा अंदाज

कोरड्या हिवाळ्यानंतर उत्तरेकडील पर्वतीय राज्य आणि उत्तर भारतातील मैदानी भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाली आहे. उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये यंदाच्या हंगामातील पहिल्या मोठा हिमवर्षाव पाहायला मिळाला. उत्तर भारतातील मैदानी भागांना दिलासा मिळाला. आयएमडीने म्हटलं आहे की, येत्या पाच दिवसांत गारठा वाढण्याची शक्यता नाही. वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव कमी झाल्यामुळे देशातील हवामान कायम राहण्याचा अंदाज आहे.

‘या’ भागात पावसाची शक्यता

देशाच्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरूच राहणार असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे. मैदानी भागात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसानंतर उत्तर भारतासह देशातील अनेक भागात थंडीपासून काहीसा दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान उत्तर-पश्चिम भारतात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशात अनेक भागात पावसाची हजेरी पाहायला मिळाली. त्यामुळे 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान वारे पश्चिमेकडे वळतील. त्यामुळे किमान तापमानात दोन ते चार अंशांनी घट होऊन देशात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

थंडीसह दाट धुक्याची शक्यता

IMD ने सांगितले की 2 फेब्रुवारी रोजी पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर पश्चिम उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट झाली. आयएमडीच्या अंदाजानुसार, 4 फेब्रुवारीला डोंगराळ भागात आणि मैदानी भागात गारपीट होण्याची शक्यता असून यानंतर थंडीत आणखी घट होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने ताज्या अंदाजात सांगितलं आहे की, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, चंदीगड, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात 4 फेब्रुवारी रोजी हलक्या गारपिटीची शक्यता आहे. पंजाब, हरियाणाच्या विविध भागात 3 फेब्रुवारीपर्यंत आणि दिल्लीत 7 फेब्रुवारीपर्यंत दाट धुके पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 4 फेब्रुवारीला जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या भागांचे तापमान वाढेल.

अधिक पाहा..

Related posts