पुणे : भ्रष्टाचाऱ्यांना मतदान नको उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन | Deputy Chief Minister Devendra Fadnavis appeals to corrupt officials not to vote pune print news amy 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

भ्रष्टाचाराला शिष्टाचार म्हणून स्वीकारले जाते तोपर्यंत भ्रष्टाचार संपणार नाही. भ्रष्टाचारी निवडून आल्यास भ्रष्टाचारी पुन्हा भ्रष्टाचार करतो आणि पैसा-सत्तेच्या सूत्राला जनतेचा आशीर्वाद आहे असे मानले जाईल. त्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांना निवडणुकीत निवडून देता कामा नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

हेही वाचा >>>पुणे : सारसबाग परिसरात तरुणीचा मोबाईल हिसकावणारा अटकेत

भारतीय छात्र संसद फाउंडेशन, एमआयटी विश्वशांती विद्यापीठ आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित बाराव्या भारतीय छात्र संसदेच्या समारोपावेळी फडणवीस बोलत होते. लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार, सुमित्रा महाजन, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, संस्थेचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष राहुल कराड, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवी चिटणीस आदी या वेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, की इंग्रजांच्या विचारांचा पगडा आजही देशावर आहे. मात्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना देशाला पुढे नेण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य आणि प्रयत्नांची गरज आहे. लवकरच भारत जगातली तिसरी आर्थिक महासत्ता होईल. देशाच्या अर्थव्यवस्थेला लावण्यासाठी तरुणांना सक्षम केले पाहिजे. नव्या शिक्षण धोरणामुळे शिक्षण उपयोजित होण्यासह विद्यार्थ्यांना आवडीचे शिक्षण, रोजगारक्षम मनुष्यबळ घडवणे शक्य होईल.
देशासाठी काही करायचे असल्यास राजपथावर चालून उपयोग नाही, तर कर्तव्यपथावर चालले पाहिजे. गरूडाप्रमाणे मोठी झेप घेण्याची क्षमता प्राप्त केली पाहिजे. चांगली व्यक्ती म्हणून मान मिळवण्याचा प्रयत्न केल्यास आयुष्यात यश नक्कीच मिळते, असे सुमित्रा महाजन म्हणाल्या. तरुणांनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत. मात्र ही स्वप्ने स्वतःसाठी नाही, तर दुसऱ्यांसाठी, त्यांच्या विकासासाठी असायला हवीत. जातीभेदाच्या पलीकडे जाऊन देश घडवला पाहिजे, असे मीरा कुमार म्हणाल्या.

हेही वाचा >>> गव्हाण : कशासाठी तर… फक्त मुलांचा स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी

दोन विद्यापीठांचे विद्यार्थी
आज विद्यार्थी दोन विद्यापीठांचे विद्यार्थी आहेत. एक शिक्षणाचे विद्यापीठ आणि दुसरे व्हॉट्सॲप विद्यापीठ. समाजमाध्यमांतून चुकीची माहिती आणि नकारात्मकता पसरवली जाते. सकारात्मकता देशाला पुढे नेण्यासाठी गरजेची आहे. नकारात्मकतेच्या जोरावर देश उभा राहू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

चांगल्या लोकांनी राजकारणात येण्याची आवश्यकता
राजकारणात वाईट लोक आहेत असे म्हटले जात असेल, तर तरुणांनी राजकारणात यायला हवे. देशात तरूण खासदारांची संख्या फार कमी आहे. चांगले लोक राजकारणात आले नाही, तर राजकारणात असलेल्यांना दोषी ठरवता येणार नाही. नोकरीत ५८-६० वयाला निवृत्ती असते. पण वय होऊनही मी काम करू शकतो, पंतप्रधान होऊ शकतो असे नेते म्हणतात. युवकांना पैसा मिळवायचा असतो. पण मिशन म्हणून काम केले तर काहीही अशक्य नाही. जबाबदारीने चांगले काम केल्यास कोणी घराणेशाही, भांडवलशाही, जातीचा विषय काढत नाही, असे महाजन म्हणाले.Related posts