Pune Rada at Savitribai Phule Pune University By Akhil Bharatiya Vidyarthi Parishad Workers ABP Majha



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अभाविपचा राडा,नाटकातील कलाकारांना अभाविप  कार्यकर्त्यांकडून मारहाण
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून काल संध्याकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आलं होतं. जब वी मेट या नावाच्या या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न आला होता. ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेष राजेंद्र नावच्या विद्यार्थ्याने या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. मात्र या नाटकातील संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि नाटकाचा प्रयोग उधळून लावला.  यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली.  त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आलेत. 

Related posts