पुणे : पण हल्ली मला सुप्रिया जे सांगेल तेच ऐकावं लागतं : शरद पवार | Sharad Pawar and Supriya Sule honored families with single daughter families on behalf of Pune Doctors Association svk 88( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने सिंगल डॉटर फॅमिली असणार्‍या कुटुंबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.तर यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची मुलाखत देखील झाली.त्यावेळी दोघांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तर देखील दिली.तुमच्यात आणि सुप्रिया सुळे यांच्यात कधी मतभेद होतात का ? त्यावर शरद पवार म्हणाले की, पक्ष चालवताना थोडेफार मतभेद होतातच. पण एकत्रित काम करण्याची तयारी ठेवावीच लागते. संघटनेमध्ये काम करताना मग अडचण येत नाही. पण हल्ली मला सुप्रिया जे सांगेल तेच ऐकावं लागतं असल्याच म्हणतात सभागृहात एकच हशा पिकला.

तुम्हाला एकच मुलगी म्हणून त्यावेळी सामना करावा लागला असेल, त्यावर शरद पवार म्हणाले की, फारसा सामना करावा लागला नाही. त्यावेळी निवडणुकीच्या निमित्ताने एका गावात गेलो.तेव्हा एक जण माझ्या जवळ आला आणि म्हणाला आम्ही तुम्हाला मतदान करतो.पण एकच मुलगी,जर उद्या काही बर वाईट झाल.तर अग्नी कोण देणार,लोकांना अग्नीची चिंता आहे.पण मुलांची चिंता नाही.ही गोष्ट काही मला मान्य नाही.अस मी स्पष्टपणे सांगितल.

शरद पवार यांना विचारण्यात आल की,तुमच्या कुटुंबात चार पिढ्यातील महिलांबाबत काय वाटतं ?त्यावर ते म्हणाले की, घरातील प्रत्येक भावंडांवर आईने संस्कार केले.अनेक परदेशात शिक्षण घेतले. आम्ही मोठे झालो.तर देखील आईच आमच्या सगळ्यांवर लक्ष असायचं, तसेच जो कही आहे. तो माझ्या आईमुळे असून आईमुळे माझा स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मी महिलांसाठी इतकं करु शकलो असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.तुमच्या दोघांचं नात कस आहे ? त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,आम्ही कुठल्याही ग्रहावरून आलेलो नाही.आम्ही देखील तुमच्या सारखी माणसाच आहोत असल्याचे त्यांनी त्यांनी सांगितले.

एकच मुलगी असल्यावर अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात : शरद पवार
शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले होते की, माझ्या मुलीला राजकारणात कुठलाही रस नाही ती राजकारणात येणार नाही.ती मुलाखत सभागृहात स्क्रीनवर दाखविण्यात आली.ते पाहून शरद पवार म्हणाले की, ही गोष्ट खरी आहे. पण एकच मुलगी असल्यावर बापाला अनेक गोष्टी सहन करावा लागतात त्यातलीच ही गोष्ट असून मला वाटल की ही राजकारणात पडणार नाही.मात्र बापाच अंदाज कसा चुकीच ठरवू शकते. याच उदाहरण म्हणजे हे अस शरद पवार म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

महिलांना राजकारणात अधिकाधिक संधी मिळाली पाहिजे : शरद पवार
संसदेत आणि विधानसभेत महीला खुप कमी आहेत. मंत्रिमंडळात एकही महिला नाही यबदल्ल काय वाटत ? त्यावर शरद पवार म्हणाले की, राजकारणात महिला आरक्षणचा निर्णय घेतल्यावर अनेक ठिकाणी मला विरोधला सामोरे जावे लागले.पण कालांतरानं बदल होता गेला.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अधिकधिक महिला दिसत आहे.पण विधानसभा,लोकसभेत देखील महिला दिसल्या पाहिजेत. महिला बद्दलची मानसिकता बदलली पाहिजे.महिलांना मुलींना निर्णय घेण्याचा अधिकार आहे.नेत्यांना महिला निवडून येईल का असा प्रश्न असतो म्हणून तिला संधी दिली जात नाही.मुलगी निवडून आल्यावर काम करू शकते ही मानसिकता आपण ठेवली पाहिजे.राजकारण्यांना मतदाराची भीती असते म्हणून स्त्रियांना संधी कमी दिली जाते असं माझं मत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,आमचा पक्ष जरी छोटा असली तरीराष्ट्रवादीमध्ये महिलांना समान संधी दिली जाते. चार खासदारांपैकी दोन महिला खासदार आहेत. त्या महिला खासदार बाबत सभागृहात इतर पक्षातील प्रमुख नेते मंडळी सांगतात की,यांच्याकडून सभागृहात कसे बोलायचे हे पहा हे पाहून खूप समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

इंदिरा गांधी यांच्या सारख्या नेत्या होणार नाही : शरद पवार
तुम्हाला प्रभावित करणाऱ्या महिला कोणत्या त्यावर शरद पवार म्हणाले की,राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, बुलढाणा येथील ताराबाई शिंदे आणि इंदिरा गांधी सगळ्या माझ्या प्रेरणा राहिल्या आहेत.तर त्यामध्येइंदिरा गांधी यांच्या सारखी नेता पुन्हा कधीचं बघ्याला भेटणार नाहीत आणि त्यांच्यासारख्या नेत्या होणार नाही.माझा त्यांच्याशी संघर्ष झाला पण त्यांचं व्यक्तिमत्त्व वेगळं होत.कर्तृत्तव दाखवायची संधी दिली. तर स्त्री ते सिद्ध करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी आहेत.देशांनी जगाने इंदिरा गांधी यांचे कर्तृत्व मान्य केले हे आपल्याला मान्य केलेच पाहिजे.अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘ती’ सभा मी पाहिलीच नाही : सुप्रिया सुळे
साताऱ्याच्या सभेमध्ये शरद पवार यांनी भिजताना भाषण केले.त्यावेळी तुमची भावना काय होती.त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की,त्यावेळी मी प्रचारात होते.मी प्रचार झाल्यावर कुठे आहात.तर सांगितले की, शशिकांत शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या केक कट करत होते. काही वेळाने फोटो पाहिला. ती सभा भारतीय राजकारणाचा टर्निंग पॉईंट ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.Related posts