पुणे : शहरभर कोंडी; वाहनचालकांना मनस्ताप खड्डयांमुळे भर | The traffic congestion across the city has given drivers a headache pune print news amy 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

शहरभर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना शनिवारी सायंकाळी मनस्तापाला सामोरे जावे लागले. डेक्कन जिमखाना, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्त्यावर कोंडी झाली होती. पाच ते दहा मिनिटांचे अंतर कापण्यासाठी वाहनचालकांना अर्धा ते पाऊणतास लागला. वाहतूक पोलिसांची कोंडी सोडविताना दमछाक झाली.

हेही वाचा >>> २०१४ ते २०१९ मध्ये किती उद्योग गुजरातला पाठले हे देखील फडणवीसांनी सांगावे – नाना पटोले

डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्त्यावर मोटारींच्या रांगा लागल्या होत्या. शनिवारी सायंकाळी शहरात पावसाच्या तुरळक सरी पडल्या. पावसामुळे अनेकजण मोटारीतून बाहेर पडले होते. रस्त्यावर मोठ्या संख्येने मोटारी आल्याने कोंडीत भर पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोथरुड भागातील एका शैक्षणिक संस्थेत कार्यक्रम होता. उपमुख्यमंत्र्यांच्या ताफा जाणार असल्याने पौड रस्ता, कर्वे रस्ता भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले होते. महत्वाच्या चौकातील वाहतूक नियंत्रक दिवे बंद ठेवण्यात आले होते. पावसामुळे मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर आल्याने कोंडीत भर पडल्याची माहिती वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्त्यावर खड्डे पडले आहेत. खड्डयांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला होता.शास्त्री रस्ता, टिळक रस्ता, शंकरशेठ रस्ता परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. शनिवारी सायंकाळी शहरातील महत्वाचे रस्त्यांवर कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.Related posts