पुणे : विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणी शिक्षिकेवर गुन्हा( प्रगत भारत । pragatbharat.com)

विद्यार्थ्याचे डोके भिंतीवर आपटून त्याला जखमी केल्याने एका शिक्षिकेच्या विरोधात विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लोहगाव भागातील एका शाळेत ही घटना घडली.

हेही वाचा >>> पुणे : भ्रष्टाचाऱ्यांना मतदान नको उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

या प्रकरणी शिक्षिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराचा सात वर्षांचा मुलगा लोहगाव भागातील एका शाळेत शिकत आहे. मुलाची वर्गातील मुलाशी भांडणे झाली. त्या वेळी शिक्षिकेने मुलाला मारहाण केली. त्याचे डोके भिंतीवर आपटले. या प्रकाराची माहिती कोणाला दिल्यास शाळेतून काढून टाकेल, अशी धमकी दिली, असे मुलाच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा >>> गव्हाण : कशासाठी तर… फक्त मुलांचा स्क्रीनटाईम कमी करण्यासाठी

मारहाणीमुळे मुलगा घाबरला. त्याचे डोके दुखत असल्याने त्याच्याकडे विचारणा करण्यात आली. तेव्हा शिक्षिकेने मारहाण केल्याचे उघडकीस आल्याचे मुलाच्या वडिलांनी नमूद देले. सहायक पोलीस निरीक्षक सुनील निगुडकर तपास करत आहेत.

Related posts