Indian Cricketer Yuzvendra Chahal And Wife Dhanshree Verma Shares Romantic Reel On Instagram( प्रगत भारत । pragatbharat.com)

Yuzvendra Chahal and Dhanashree Verma : भारताचा आघाडीचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री चहल (Dhanashree Chahal) यांच्या ब्रेक-अपच्या चर्चांना मागील काही दिवसांपासून उधाण आलं होतं. धनश्रीनं इन्स्टाग्रामवरुन चहल नाव काढल्यानंतर या चर्चा आणखी वाढल्या. पण असं सर्व सुरु असताना आता युजवेंद्रने एक अतिशय रोमँटिक रिल त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

यामध्ये युजवेंद्रने धनश्रीलाही टॅग केलं आहे. या व्हिडीओमध्ये दोघेही अगदी आपले प्रेमाचे क्षण घालवत मजा-मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओला कॅप्शन देताना चहलनं लिहिलं आहे, ‘माझी खरी ताकद तूच (धनश्री) आहेस.’ प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिनेही या व्हिडीओवर इमोजी टाईप करत कमेंट केली आहे.

पाहा व्हिडिओ-


भारताचा स्टार फिरकीपटू

युजवेंद्र चहलने आतापर्यंत 246 टी20 सामन्यात 280 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विकेट्सचा विचार करता चहलने भारतासाठी 58 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 74 विकेट्स घेतल्या असून आयपीएलमध्ये 131 सामन्यात 166 विकेट्स घेतल्या आहेत. तर स्थानिक टी20 क्रिकेटमध्येही त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या हंगामात त्यांनी 17 सामन्यात 19.51 च्या सरासरीने आणि 7.75 च्या इकॉनॉमीने 27 विकेट्स घेत पर्पल कॅप मिळवली. आता या कमाल फॉर्ममुळे चहल आगामी आयसीसी टी20 विश्वचषकातही (ICC T20 WorldCup) सिलेक्ट होऊ शकतो.

हे देखील वाचा- 

 Related posts