Job Majha Navi Mumbai Municipality Deecan Education Society Medical College Gondia Recruitment Job Vaccency( प्रगत भारत । pragatbharat.com)

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच ‘एबीपी माझा’ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 

नवी मुंबई महानगरपालिका, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड या ठिकाणी विविध पदांसाठी भरती सुरू आहे. त्यासाठी पात्रता याक आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे, 

नवी मुंबई महानगरपालिका (पदव्युत्त संस्था)

विविध पदांच्या 44 जागांसाठी भरती निघाली आहे.

पोस्ट – प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी

एकूण जागा – 44

नोकरीचं ठिकाण – नवी मुंबई

मुलाखतीचं ठिकाण – नवीन मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भूखंड क्र. 1, सेक्टर 15 ए, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई

मुलाखतीची तारीख- 22 आणि 23 सप्टेंबर 2022

तपशील – www.nmmc.gov.in

डेक्कन एज्युकेशन सोसायटी

पोस्ट – प्राचार्य, ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – B.A.LLB

एकूण जागा – 25

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

तपशील – www.despune.org  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, गोंदिया

पोस्ट – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी/MD/MS

एकूण जागा – 7

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2022

तपशील –www.gmcgondia.in

श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, बीड

पोस्ट – वसुली अधिकारी, कनिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता – वसुली अधिकारी पदासाठी M.Com, कनिष्ठ अधिकारी पदासाठी M.Com./ MBA

एकूण जागा – 9

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

तपशील – shahubank.com  (या वेबसाईटवर गेल्यावर Stay connected मध्ये careers वर क्लिक करा. Advertisement For Recovery Officer and Junior Officer यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

Related posts