धक्कादायक : स्वत:चाच गळा चिरून तरुणाची आत्महत्या; धायरी भागातील घटना( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे : धायरीतील रायकर मळा भागात एका तरुणाने स्वतःच्या गळ्यावर कटरने वार करुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
महेश राजाराम तवंडे (वय ३२, रायकर मळा, धायरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. महेश खासगी कंपनीत नोकरी करत होता. तो आणि त्याची मैत्रिण सदनिका भाडेतत्त्वार घेऊन रायकर मळा भागात राहत होते. त्याची मैत्रीण बाहेरगावी गेली होती. शुक्रवारी तो मोबाइलवर कोणाशी तरी मोठ्या आवाज बोलत होता. त्यानंतर दिवसभर सदनिका आतून बंद होती. संशय आल्याने रात्री सदनिका मालकाने दरवाजा वाजविला. प्रतिसाद न मिळाल्याने घरमालकाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सिंहगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी घटनास्थळी भेट दिली. तेव्हा महेशने कटरने स्वत:चा गळा चिरून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आला असून या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

Related posts