chimpanzee kisses young girl viral trending video marathi viral news

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chimpanzee Kiss Girl : सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ आपण पाहतो. यामध्ये प्राण्यांचेही काही व्हिडीओ असतात. प्राण्यांमधील मारामारी तर कधी त्यांच्यातील प्रेम असे व्हिडीओ आपण पाहिले असतील. अशातच एका चिपांझी माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या माकडाने जे केलं ते पाहून कोणालाच विश्वास बसला नाही मात्र तेच सत्य आहे. 

व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
या व्हिडीओमध्ये एक तरूणी चिपांझी माकडासोबत फोटो काढण्यासाठी उभी असलेली पाहायला मिळते. मात्र चिपांझी मुलीच्या शेजारी बसतो आणि तरूणीकडे पाहतो तेव्हा त्याच्या काय मनात आलं असावं माहित नाही. माकड आधी मुलीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला आपल्या बाजूला बसवतो. तो तिला आपल्या मिठीत घट्ट पकडतो. त्यानंतर तिच्या गालाचा किस  घेऊ लागतो. हे घडताना तरूणीला हसू आवरत नाही.

इतकंच नाहीतर माकड किस घेऊन तिच्या मागे जातो मुलीला मागच्या बाजूने पकडताना दिसत आहे. माकडाच्या या हरकतीमुळे तरूणी चांगलीच लाजलेली दिसली. ती फक्त फोटो घेण्यासाठी गेली होती मात्र माकड असं काही कृत्य तिच्यासोबत करेल असा विचारही तिनं केला नसेल. 

 

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून सर्वांनाच हसू येत आहे. इन्स्टाग्रामवर naturepixm  नावाच्या अकाऊंटवरही ते अपलोड करण्यात आलं आहे. या व्हिडीओवर नेटकरी मजेशीर कमेंट करत आहेत.

Related posts