Maghi Ganesh 2024 Date : कधी आहे माघी गणेशोत्सव?…म्हणून साजरी करतात माघी गणेश जयंती

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maghi Ganesh Jayanti 2024 Date : भाद्रपद महिन्यात तब्बल 10 दिवस गणरायाचं घरोघरी आगमन होतं. मुंबईत गणेशोत्सवाची धूमच काही और असते. प्रत्येक जण या उत्सवाची मोठ्या उत्साहने वाट पाहत असतो. घरोघरी आणि मंडपांमध्ये गणराया विराजमान होत असतात. कोणाकडे दीड दिवस, तर कोणाकडे अडीच, पाच दिवसांचा बाप्पाचा मुकाम असतो. या वर्षी 19 सप्टेंबर 2024 ला गणरायाचं आगमन होणार आहे. त्यापूर्वी महाराष्ट्रासह काही भागात माघ महिन्यात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. त्याला माघी गणेशोत्सव असं म्हटलं जातं. कधी आहे माघी गणेशोत्सव आणि तो का साजरा करण्यात येतो जाणून घेऊयात. (When is the Maghi Ganesh festival Date and so they celebrate Maghi Ganesh Jayanti significance and puja rituals in marathi)

कधी आहे माघी गणेशोत्सव?

हिंदू धर्मानुसार माघ चतुर्थीला बाप्पाचा जन्म म्हणजे गणेश जयंती साजरी (Maghi Ganesh Jayanti 2024) करण्यात येते. गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी या नावानेही ओखळलं जातं. महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी दीड दिवसांसाठी बाप्पा घरी येतो. तर काही ठिकाणी या दिवशी सार्वजनिक गणेश मंडळही बाप्पाची स्थापना करतात.

2024 माघी गणेश जयंती तारीख आणि मुहूर्त!

चतुर्थी तिथी – 12 फेब्रुवारी 2024  ला संध्याकाळी 05 : 44 वाजेपासून 13 फेब्रुवारी 2024 दुपारी 02 : 41 वाजेपर्यंत
गणेश पूजा मुहूर्त –  13 फेब्रुवारी 2024  सकाळी 11:40 वाजेपासून दुपारी 01:58 वाजेपर्यंत 

माघी गणेशोत्सव का साजरा करतात?

हिंदू धर्मानुसार गणरायाचे तीन अवतार मानले जातात. त्यानुसार तिन्ही अवताराचा वेगवेगळ्या तिथीला जन्म झाला. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस आणि त्यानंतर दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस त्याशिवाय तिसरा दिवस हा माघी शुक्ल चतुर्थीचा म्हणजे  गणेश जयंती साजरी करण्यात येणार आहे. 

यामागे अजून आख्यायिका अशी आहे की, गणपतीने असुराचा वध करण्यासाठी तीनवेळा वेगवेगळे अवतार जन्म घेतला होता. स्कंद पुराणात माघ महिन्यातील अवताराबद्दल असं म्हटल जातं की, माघी महिन्यातील या तिथीला गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक अवतारात जन्म घेतला होता. म्हणून या तिथीला गणेश जयंती साजरी करण्यात येते. 

माघी गणेश जयंतीला काय करावे?

या दिवशी गणपती बाप्पाना नैवेद्यामध्ये तीळाचा पदार्थ द्यावा. जर तुम्ही बाप्पाचा आवडीचा मोदक करणार असाल तर तीळ आणि गूळाचा तयार करावा.  या दिवशी गणपतीची विधीवत पूजा करून त्याचे दुसर्‍या दिवशी विसर्जन केले जाते. गणेश जयंतीला व्रत करुन घरात सुख, शांती, समृद्धी वाढते मनोकामना पूर्ण करा अशी प्रार्थना केली जाते. 

कशी करा पूजा?

मातीची किंवा घरातील तांबी, पितळ, चांदीची मूर्तीच पूजा करावी. त्यानंतर 16 षोडशोपचारने पूजा संपन्न झाल्यावर आरती करुन अथर्वशीर्षाचं पठण करावं. यादिवशी आठवणीने बाप्पाला 21 दुर्वा नक्की अर्पण करा. मातृदेवता ही 21 असते आणि गणराया हा मातृप्रिय असल्याने त्याला 21 दुर्वा वाहवेत. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts