मराठवाडा मुक्ती संग्राम अभ्यासक्रमात घ्या – राज ठाकरे( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. त्यामुळे या लढय़ाचा इतिहास शाळेत शिकविण्याची मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. तसेच औरंगाबादकरांच्या उरावर बसलेल्या ‘रझा’कार आणि ‘सजा’कारांचा मनसे लवकरच बंदोबस्त करेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

आजचा दिवस एखाद्या उत्सवासारखा साजरा व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करीत ठाकरे यांनी पुन्हा एकदा काँग्रेस, शिवसेना आणि एआयएमआयएम या पक्षांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

Related posts