Girls still victims Abuse minor girl accused arrested ysh 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

राहाता : मुलींचे शिक्षण आणि प्रगतीचे गर्वगीत देशात गेल्या दोन दशकांपासून उच्चरवात गायले जात असले, तरी अजूनही प्रथा परंपरेच्या दुष्टचक्रात मुली भरडल्या जात आहेत. लग्नाआधी आईच्या इच्छेनुसार परपुरूषाशी संबंध ठेवण्याची प्रथा असलेल्या महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यातील एका खेडय़ात हा अघोरी प्रकार नाकारणाऱ्या १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात या मुलीवर अत्याचार करणारा आरोपी तसेच मुलीच्या आईच्या विरोधात बाल लैंगिक शोषण संरक्षण अधिनियम कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.

हेही वाचा <<< नंदुरबारच्या पीडित कुटुंबीयांवर दबाव टाकण्याचा पोलिसांचा प्रयत्न? 

हेही वाचा <<< उड्डानपुलावर कारची दुचाकीला जबर धडक; पुलाखाली कोसळून पत्नी ठार, पती गंभीर

याबाबत मुलीच्या आतेभावाने राहाता पोलिस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा फिर्याद दाखल केली आहे. १ सप्टेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने तिला सांगितले, की ‘आपल्या समाजाच्या चालीरीतीप्रमाणे तुला परपुरुषाशी संबध ठेवावे लागतील.’ तेव्हा या मुलीने आईला आईला विरोध केला. ६ सप्टेंबर २०२२ रोजी आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे पीडित मुलीच्या घरी आला. त्या वेळी पीडितेच्या आईने तिला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडले. या वेळी आरोपीस पीडितेच्या आईने मदत केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पीडित मुलीची आई आणि आरोपी आबासाहेब रामचंद्र भडांगे यांच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक शोषण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा <<< धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यात अडचणी; न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा

काय घडले?

‘तू आता वयात आल्याने आपल्या समाजाची चालीरीती म्हणून तुला परपुरुषाशी संबंध ठेवावा लागेल,’ असे म्हणत जन्मदात्या आईनेच आपल्या आठवीत शिकणाऱ्या केवळ १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला परपुरुषाशी संबंध ठेवण्यास भाग पाडले.  कोपरगाव तालुक्यात हा प्रकार घडला.

पुरोगामी महाराष्ट्रातही अघोरी प्रकार

शिक्षण आणि तंत्रज्ञान गावागावांत पोहोचले असले, तरी करोनानंतर भीतीने ग्रामीण भागांत आठवी ते दहावीतील मुलींचे विवाह जबरदस्तीने लावून दिले जात होते. बालविवाहाचा प्रकार करोना संकटानंतर जसा पुन्हा वाढला, तशा इतर प्रथाही डोके वर काढतील की काय, अशी चिंता समाजशास्त्रज्ञांना आहे.Related posts