Dussehra Mela Shivaji Park Shiv Sena chief Uddhav Thackeray decision ysh 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये जात असताना सध्याचे राज्य सरकार काय करीत होते, असा सवाल माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. तसेच दसरा मेळाव्यावरून सध्या राजकारण सुरू असले तरी हा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होईल, असा निर्धार व्यक्त केला.

हेही वाचा <<< वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान शिंदे गटाला; दसरा मेळाव्यासाठी बंडखोरांचा अर्ज स्वीकारला, शिवसेनेचा फेटाळला

हेही वाचा <<< फॉक्सकॉनकडून किती लाच मागितली होती?; आशीष शेलार यांचा महाविकास आघाडीला सवाल

ठाकरे यांनी शिवसेना भवनमध्ये झालेल्या पदाधिकारी बैठकीत  राज्य सरकारवर टीका केली आहे. ठाकरे म्हणाले की,  गुजरात महाराष्ट्राचा लहान भाऊ आहे. पण दोन महिन्यांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेलाच कसा? हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.सत्ताधाऱ्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करावे.

हेही वाचा <<< मराठवाडा मुक्ती संग्राम अभ्यासक्रमात घ्या – राज ठाकरे

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असून त्याबाबत कोणीही संभ्रम ठेवू नये, असे ठाकरे यांनी सांगितले. शिवाजी पार्क दसरा मेळाव्यासाठी देण्याबाबत महापालिकेने अद्याप निर्णय न घेतल्याने स्मरणपत्रही पाठविण्यात आले आहे. शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा २१ सप्टेंबर रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर होणार असून त्यादृष्टीनेही संघटनात्मक तयारी करण्याच्या व बैठका घेण्याच्या सूचना ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसेना कार्यकर्ते मुंबईत दाखल होतील, असे नियोजन करण्यात येत आहे.Related posts