५० संगीतकारांना एम. एस. सुब्बलक्ष्मी शिष्यवृत्ती प्रदान( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : देशभरातील ५० तरुण संगीतकारांना ‘श्री षण्मुखानंद भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी संगीत शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. येथील षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रथमच १२ नव्या संगीतकारांना शिष्यवृत्ती बहाल केली. संगीततज्ज्ञ डॉ. टी. एस. सत्यव्रती यांना ‘संगीत प्राचार्य’ पुरस्काराने गौरवण्यात आले.

कर्नाटकी संगीत, शास्त्रीय संगीत, हरिकथा, नादस्वर, वीणा, सतार, सेक्साफोन, घटम्, बासरी, तबला आणि व्हायोलिन या प्रकारातील संगीतकारांचा यात समावेश आहे. प्रतिवर्षी १ लाख रुपये असे या शिष्यवृत्तीचे स्वरूप आहे. मुंबई, पुण्यासह चेन्नई, सिलिगुडी, वाराणसी, कोलकाता, धारवाड, बंगळुरू, मंगळुरू, मैसूर, उडुपी, कांचीपुरम्, केरळ, हैदराबाद, दिल्ली येथील संगीतकारांना यंदा शिष्यवृत्ती देण्यात आली. यात ३८ संगीतकारांची शिष्यवृत्ती कायम ठेवण्यात आली असून १२ नव्या संगीतकारांचा समावेश करण्यात आला. २०१५पासून उदयोन्मुख संगीतकारांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. यावेळी बंगळुरू येथील संगीततज्ज्ञ डॉ. टी. एस. सत्यव्रती यांचा ‘षण्मुखानंद डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी संगीत प्राचार्य पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अमजद अली खान आणि शुभलक्ष्मी बारुआ खान उपस्थित होत्या.

५० तरुण संगीतकारांना ‘श्री षण्मुखानंद भारतरत्न डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी संगीत शिष्यवृत्ती’ प्रदान करण्यात आली. या वेळी संगीततज्ज्ञ डॉ. टी. एस. सत्यव्रती यांचा ‘संगीत प्राचार्य पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला सरोदवादक उस्ताद अमजद अली खान आणि शुभलक्ष्मी बारुआ खान उपस्थित होत्या.

Related posts