t20 world cup 2022, गेल्या मार्चपासून टीममधून बाहेर, रोहित शर्मा आणि के एल राहुलच्या तोडीस तोड खेळाडूला संधी नाहीच – t20 world cup mayank agarwal did not play a single match after march 2022 for team india( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई:टीम इंडिया 2022 च्या T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे. तर भारत A संघ न्यूझीलंड A विरुद्ध खेळत आहे. परंतु एक धडाकेबाज फलंदाज या दोन्ही संघांमध्ये आपले स्थान निश्चित करु शकलेला नाहीये. या खेळाडूने भारतीय कसोटी संघात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती, मात्र केवळ एकाच मालिकेत खराब कामगिरीमुळे या खेळाडूला संघात पुन्हा स्थान प्राप्त करता आले नाही.

यावेळी टीम इंडियामध्ये सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना पहिली पसंती आहे. या दोन खेळाडूंच्या शानदार खेळामुळे सलामीवीर मयांक अग्रवाल दीर्घकाळापासून टीम इंडियामधून बाहेर आहे. या वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध मयांकची कामगिरी अत्यंत खराब होती. त्यानंतर निवडकर्त्यांनी त्याला बाहेरचा रस्ता दाखवला होता. भारतीय संघातून बाहेर होताच मयांक अग्रवालच्या कारकिर्दीवर संकटाचे ढग दाटलेले दिसत आहेत.

हेही वाचा -IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का, मोहम्मद शमी संघाबाहेर

भारतीय कसोटी संघाने या वर्षी जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. हा सामना सुरु होण्यापूर्वी रोहित शर्मा कोव्हिड पॉझिटिव्ह झाला होता. त्यानंतर मयांक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला होता. मात्र या सामन्यात शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर सलामी डावाची जबाबदारी देण्यात आली होती. मयांक अग्रवालला बॅकअप सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आले होते, त्यानंतरही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते.

हेही वाचा -ट्वेन्टी-२० विश्वचषक म्हटलं की अश्विन संघात कसा काय येतो, जाणून घ्या हे खरं कारण

कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंतची कामगिरी

मयांक अग्रवालने टीम इंडियासाठी आतापर्यंत एकूण २१ कसोटी सामने खेळले आहेत. मयांक अग्रवालने या सामन्यांमध्ये ४१.३३ च्या सरासरीने १४८८ धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत ५ अर्धशतके आणि ४ शतके झळकावली आहेत. पण श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील ३ डावात मयंकने १९.६६ च्या सरासरीने केवळ ५९ धावा केल्या. या मालिकेपासून निवडकर्त्यांती मयांक अग्रवालला टीमच्या बाहेरचा रस्ता दाखवला. मयांक अग्रवालने अनेकवेळा कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी सलामीवीरची भूमिका निभावली आहे.

आम्हाला जाणीव

Related posts