Chandigarh University Objectionable Videos Protest Mms Uproar In Punjab Mohali University Hostel Mms Girls Bath Goes Viral( प्रगत भारत । pragatbharat.com)

Punjab University Girls MMS : पंजाबच्या मोहालीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. आठ विद्यार्थिनींचा आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ माजली आहे. या विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे. मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीमधील (Chandigarh University) आठ विद्यार्थिनींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे त्याच विद्यापिठातील एका विद्यार्थिनीनं इतर विद्यार्थिनींचा आंघोळ करताना व्हिडीओ काढून व्हायरल केल्याचं समोर आलं आहे. 

60 विद्यार्थिनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

मोहालीत चंदीगड युनिव्हर्सिटीच्या आठ विद्यार्थिनींनी एकाच वेळी आत्महत्येचा प्रयत्न केला. याच विद्यापीठातील एका विद्यार्थिनीनं 60 विद्यार्थिंनींचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ शिमल्यात राहणाऱ्या एका मित्राला पाठवला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आठ विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर व्हीडिओ बनवणाऱ्या विद्यार्थिनीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

Related posts