Mohammed Shami Got Covid Infected Ruled Out Of India Vs Australia T20 Series( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mohammed Shami, Team India : भारतीय क्रिकेटमधील (Indian Cricket Team) अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर गेला आहे. भारत आगामी टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022)  स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) टी20 मालिका खेळणार आहे. टीम इंडियासाठी विश्वचषकापूर्वी हे एकप्रकारचे सराव सामने असणार आहेत. दरम्यान या दोन्ही दौऱ्यांमध्ये मोहम्मद शमी संघात असून आता मात्र त्याला कोरोना झाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी उमेश यादवचं नाव ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघात असल्याचंही समोर येत आहे. 

भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 (ICC T20 World Cup 2022)  स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. त्यापूर्वी आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) भारत टी20 मालिका खेळणार आहे. या दोन्ही दौऱ्यांमध्ये मोहम्मद शमीचं संघात नाव होतं. त्यामुळे विश्वचषकापूर्वी शमीने चांगली कामगिरी केली असती तर त्याला विश्वचषकासाठीच्या संघातही जागा मिळाली असती. कारण विश्वचषक स्पर्धा सुरु होण्यापूर्वी एक आठवड्यापर्यंत संघात बदल केला जाऊ शकतो आणि राखीव खेळाडूंमधील खेळाडूला संघात स्थान दिलं जाऊ शकतं. त्यामुळे शमीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दमदार कामगिरी केली असती तर त्याला विश्वचषकाच्या संघात जागा मिळाली असती, पण कोरोनामुळे आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून बाहेर गेल्यामुळे ही शक्यता कमी झाली आहे.    

कसा आहे भारतीय संघ?

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे ते दोघेही संघात परतले आहेत. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून संघात जागा दिली आहे. तर नेमकी टीम इंडिया कशी आहे ते पाहूया…

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.

राखीव खेळाडू

मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर 

हे देखील वाचा- 

Related posts