Video : Two leopards clashed on a coconut tree; Thrilling incident caught on camera( प्रगत भारत । pragatbharat.com)

जंगली प्राणी आपली शिकार, आपले क्षेत्र यांचा बचाव करण्यासाठी अनेकदा जबरदस्त लढत देतात. सोशल मीडियावर अशा जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही लढाया तर इतक्या थरारक असतात की त्या पाहताना आपणच थक्क होतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये दोन बिबट्यांमधील झुंज आपण पाहू शकतो.

नाशिक जिल्यातील सिन्नर या तालुक्यामध्ये ही घटना घडली आहे. येथील एका गावात असलेल्या नारळाच्या झाडावर दोन बिबटे एकमेकांना भिडले. तेथील स्थानिक रहिवाशांनी ही घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये कैद केली आहे. सिन्नर तालुक्यातील सांगवी गावात घुमरे कुटुंबियांच्या नारळाच्या झाडावर दोन बिबटले आपापसातच भिडले.

प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानंतर तिला मनवण्यासाठी मुलानं केलं असं काही… Viral Video पाहून आवरणार नाही हसू

सुरुवातीला या झाडावर एकच बिबट दिसतो. काहीवेळ तो झाडावर लटकलेला आहे. यानंतर तो हळूहळू खाली येतो. यावेळी वातावरण अगदी शांत असते. हा बिबट्या अगदी दबक्या पावलांनी खाली येतो. त्यानंतर अचानक तो पुन्हा झाडावर वेगात चढतो. काही सेकंदांतच दुसरा बिबट्या त्याच्या मागोमाग झाडावर चढतो. यानंतर दोघांमधील झुंज सुरु होते.

दरम्यान, या दोघांमध्ये कोणत्या कारणामुळे लढाई झाली हे अद्याप कळू शकलेले नाही.Related posts