पुणे : पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे दागिने लांबविले( प्रगत भारत । pragatbharat.com)

पीएमपी बसने प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबविल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला स्वारगेट पीएमपी स्थानकातून बिबवेवाडीकडे जाणाऱ्या बसमधून प्रवेश करत हाेत्या. त्या वेळी बसमध्ये गर्दी होती.

चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ३५ हजारांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस कर्मचारी तारू तपास करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी बसच्या प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहरातील प्रमुख पीएमपी स्थानकांच्या परिसरात चोरट्यांच्या सुळसुळाट झाला आहे.

Related posts