बंगालमध्ये पंचायत निवडणुकीत हिंसाचार; काँग्रेस खासदाराचे राज्यपालांना पत्र, निवडणुकीसाठी केंद्रीय सैन्य तैनात करण्याची मागणी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

West Bengal Panchayat Election:  पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान  झालेल्या हिंसाचाराचे तीव्र पडसाद उमटत आहे. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी पश्चिम बंगालच्या राज्यपालांना पत्र लिहून निवडणुकीसाठी सैन्य तैनात करण्याची मागणी केली आहे. काल पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ज्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांचे सत्र झाले सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये 8 जुलै रोजी पंचायत निवडणुका होणार आहेत. 

काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी आपल्या पत्रात म्हटले की, मुर्शिदाबाद येथील खारग्राम येथील एका काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. तो कार्यकर्ता निवडणुकीदरम्यान सक्रिय होता. हत्या करणाऱ्या आरोपीला खारग्राम प्रशासनाने संरक्षण दिले. या विरोधात आम्ही आंदोलन करणार आहोत. तृणमुल काँग्रेसला बुलेटची निवडणूक हवी की मतपत्रिकेची निवडणूक? असा सवाल उपस्थित केल. तृणमूल काँग्रेसला आम्ही हे रक्ताचे राजकारण करू देणार नाही



[ad_2]

Related posts