chandigarh university mms case new video lean in social media warden and accuse girl

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पंजाब : चंदीगढ युनिवर्सिटीच्या वसतिगृहातील (Chandigarh University Mms Scandal) मुलींचे व्हिडिओ लीक झाल्याचे प्रकरण चांगलेच तापले आहेत. या प्रकरणात एका मुलीने 60 मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ बनवून लीक केल्याची घटना समोर आली होती. या प्रकारामुळे तरूणींनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहीती समोर आली होती. या घटनेमुळे संतापलेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केल होत त्यामुळे प्रकरण खुप तापले होते. आता या प्रकरणातला आणखीण एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नेमके काय आहे ते जाणून घेऊयात.  

व्हिडिओत काय? 
चंदीगढ युनिवर्सिटीतील (Chandigarh University) या प्रकरणाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हॉस्टेल वॉर्डन आरोपी मुलीला फटकारताना आणि प्रकरणाची चौकशी करताना दिसत आहे. निर्लज्ज… तुम्हाला व्हिडिओ बनवायला कोणी सांगितले?  तो मुलगा कोण आहे, ज्याच्या सांगण्यावरून तुम्ही व्हिडिओ पाठवत आहात? तुम्ही कधीपासून व्हिडिओ बनवत आहात ? अशा प्रश्नांचा वॉर्डनने आरोपी तरूणीवर भडीमार केला. तसेच ‘तुम्ही काय घृणास्पद काम करत आहात याची तुम्हाला कल्पना आहे का, अशा शब्दान वॉर्डनने तरूणीला फटकारले. आरोपी तरुणी मात्र या प्रकरणावर शांतच बसली होती. आरोपी तरूणीला वॉर्डन फटकारताना इतर तरूणीही तिच्यासोबत उपस्थित होत्या.  

चंदीगढ युनिवर्सिटी काय म्हणाली?
या संपूर्ण प्रकरणावर चंदीगढ युनिवर्सिटी (Chandigarh University) प्रशासनाने अनेक विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवण्यात आल्याचे नाकारले आहे. तर  विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याची चर्चा पूर्णपणे अफवा असल्याचेही स्पष्टीकरण यावर दिले.   

 युनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ.आर.एस.बावा म्हणाले, “7 मुलींनी आत्महत्या केल्याची अफवा आहे, तर सत्य हे आहे की एकाही मुलीने असे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेत एकाही मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नसल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच “विविध विद्यार्थ्यांचे 60 आक्षेपार्ह एमएमएस सापडले असल्याची आणखी एक अफवा प्रसारमाध्यमांद्वारे पसरवली जात आहे. ही पूर्णपणे खोटी आणि निराधार असल्याचे बावा यांनी म्हटले आहे. 

किती व्हिडिओ लीक झाले? 

 युनिवर्सिटीतून 60 एमएमएस व्हिडिओ शेअर झाल्याचे सुरुवातीला बोलले जात होते. मात्र  युनिवर्सिटीने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले. यासोबतच युनिवर्सिटीच्या प्राथमिक तपासात आक्षेपार्ह असा कोणताही व्हिडिओ आढळला नाही. फक्त एका मुलीने शूट केलेला खाजगी व्हिडिओ बॉयफ्रेंडसोबत शेअर केला होता. त्याव्यतिरीक्त एकही व्हिडिओ लीक झाला नाही आहे.  

दुसरी अटक 
दरम्यान या प्रकरणी आरोपी तरूणीच्या बॉयफ्रेडला, जो या प्रकणात मुख्य आरोपी आहे, त्याला शिमला येथून अटक केली आहे. आरोपी तरुणी त्याला व्हिडिओ पाठवायची आणि तो सोशल मीडियावर अपलोड करायचा. या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे. 

Related posts