मुंबई : दादासाहेब फाळके चित्रनगरीत बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू | Death of a leopard cub in Dadasaheb Phalke filmcity mumbai print news amy 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी (फिल्मसिटी) परिसरात रविवारी बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. या पिल्लाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे अशक्तपणा आणि डोक्यावर आघात हे मृत्यूचे संभाव्य कारण असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : सप्टेंबरच्या पावसामुळे धरणे काठोकाठ ; धरणक्षेत्रात गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक पाऊस

मुंबई वन विभागाला दूरध्वनीवरून एक बिबट्या मृतावस्थेत आढळल्याची माहिती रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मिळाली. चित्रनगरीतील ‘चन्ना मेरेया’ च्या सेटवर बिबट्याचे पिल्लू मृतावस्थेत आढळले. अधिकाऱ्यांनी तात्काळ राष्ट्रीय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. तेथे राष्ट्रीय उद्यानाच्या तसेच मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील पशुवैद्यकांच्या पथकाने शवविच्छेदन केले. या शवविच्छेदनाचा अहवाल मंगळवारी मिळणार आहे. त्यानंतरच बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल अशी माहिती मुंबईचे वनक्षेत्रपाल राकेश भोईर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.

हेही वाचा >>> मुंबई : दादर व परळ रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी ; आरोपीला झारखंडमधून अटक

मृतावस्थेत आढळलेला बिबट्या नर असून त्याचे वय नऊ महिने आहे. शवविच्छेदनानंतर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचेही भोईर यांनी सांगितले. दरम्यान श्वासोच्छवासाच्या त्रासामुळे अशक्तपणा आणि त्वचेखालील रक्तस्राव, डोक्यावर आघात हे मृत्यूचे संभाव्य कारण सांगितले जात आहे. मात्र सविस्तर अहवालानंतरच योग्य कारण स्पष्ट होईल अशी माहिती राष्ट्रीय उद्यानाच्या वन्यजीव विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ शैलेश पेठे यांनी दिली.

चौकशीची मागणी
बिबट्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी राज्य सरकारकडे समाज माध्यमातून वन्यप्रेमी, प्राणीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमींकडून केली जात आहे.Related posts