मुंबई : सप्टेंबरच्या पावसामुळे धरणे काठोकाठ ; धरणक्षेत्रात गेल्या दोन वर्षांपेक्षा अधिक पाऊस | The dams are full due to the September rains mumbai print news amy 95( प्रगत भारत । pragatbharat.com)

सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवापासून पडू लागलेल्या पावसामुळे धऱणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणारी सातही धरणे काठोकाठ भरली असून एकूण पाणीसाठा ९८ टक्के झाला आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत धरणक्षेत्रात यंदा जास्त पाऊस पडला आहे. भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> मुंबई : दादर व परळ रेल्वे स्थानकात दहशतवादी शिरल्याचा दूरध्वनी ; आरोपीला झारखंडमधून अटक

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात चांगला पाऊस पडल्यामुळे यावर्षी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती व त्यानंतर गणेशोत्सवापासून पावसाला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. त्यामुळे धरणक्षेत्रातही चांगला पाऊस पडत असून धरणांच्या साठवण क्षमतेपेक्षाही जास्त पाऊस यंदा पडला आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत खूप जास्त पाऊस पडला आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सात धरणातील पाणीसाठा सध्या ९८.५२ टक्के आहे. सातही धरणात मिळून सध्या १४ लाख २५ हजार दशलक्ष लीटर पाणीसाठा आहे. मुंबईला दर दिवशी ३८०० दशलक्ष लीटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या सातही धरणांची पाणी साठवण्याची क्षमता साडे चौदा लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पावसाळ्याचे चार महिने संपले की ऑक्टोबर मध्ये पाणीसाठ्याचा आढावा घेतला जातो. यावेळी धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असतील तर पाणी कपातीची आवश्यकता नसते. यंदा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.

तीन वर्षांचा १८ सप्टेंबरपर्यंतचा जलसाठा
वर्ष — ( दशलक्ष लिटर मध्ये) …..टक्केवारी
२०२२ – १४,२५,९३३ …… ९८.५२ टक्के
२०२१ – १४,३२,२६७ …. ९८.९६ टक्के
२०२० – १४,१६,८७० …. ९७.८९ टक्के

हेही वाचा >>> नवी मुंबईत पावसाची संततधार सुरूच

चार महिन्यातील धरणक्षेत्रात पडलेला पाऊस
धरण ……२०२२ मधील पाऊस ……२०२१ मधील पाऊस

उर्ध्व वैतरणा …….२८२९ मिमि …..२२४० मिमी
मोडक सागर ………३४३९ मिमी ……२९४८ मिमी

तानसा …………..३१४४ मिमी ……२६५५ मिमी
मध्य वैतरणा ….३५३० मिमी …..२४०४ मिमी

भातसा …………३७९० मिमी ……२६८२ मिमी
विहार ……………३२२७ मिमी …….३०४५ मिमी

तुलसी …………..४५८० मिमी ……४५५६ मिमीRelated posts