Fight For Change Breaking Tradition Women Entered In Maruti Temple At Beed District Ambajogai Dhanora Village( प्रगत भारत । pragatbharat.com)

Beed Latest News Update : आज देखील राज्यातील बहुतेक मारुती मंदिरामध्ये (Maruti Temple) महिलांना (Women) प्रवेश दिला जात नाही. मात्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक (Beed District Ambajogai Dhanora Village) या गावच्या महिलांनी आज परिवर्तनाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे. गावातील सगळ्या महिला एकत्र येऊन त्यांनी मंदिरात प्रवेश करून मारुतीरायाचे दर्शन घेतले.  महिलांच्या धाडसाचं परिसरात कौतुक केलं जात आहे. या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील गावातील महिला मंडळाच्या बैठकीत महिलांना मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश नसणे आणि पुरुषांना प्रवेश असणे म्हणजे लिंगाच्या आधारावर होणारा भेदभाव आहे, असे मत गावातील आशालता आबासाहेब पांडे यांनी व्यक्त केले. “मासिक पाळी हा काही विटाळ नाही तर केवळ ही एक नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे मंदिरात प्रवेश केल्याने देवाला विटाळ होत नाही तर माणसांनी तयार केलेली हr प्रथा आज पासून बंद करण्याचा निर्णय गावातील महिलांनी केला आहे, अशी माहिती यावेळी बोलताना अशा लता पांडे यांनी दिली. 

केवळ महिला मारुती मंदिरात गेल्या म्हणून विटाळ होतो ही प्रथा बंद करण्याचा निर्णय या महिलांनी घेतला आणि आज सकाळी सगळ्या महिला एकत्रित येऊन त्यांनी गावातील मारुती मंदिरामध्ये प्रवेश केला. आज सकाळी आशालता आबासाहेब पांडे, चित्रा बाळासाहेब पाटील यांनी इतर महिलांना सोबत घेत मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आणि मारूतीच्या गाभाऱ्यात जाऊन नारळ फोडले. 

एका छोट्याश्या गावातील महिलांनी एकत्रित येऊन कित्येक वर्षाची जुनी रूढी परंपरा जुगारात देऊन आज परिवर्तनाच्या दिशेने खऱ्या अर्थाने पाऊल टाकलं आहे. विशेष म्हणजे या लढ्यामध्ये या महिलांच्या घरातील पुरुष सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून या लढ्यात उभे राहिले.  
गावकऱ्यांकडून कौतुक

वर्षानुवर्षे महिलांना मारूती मंदिरात बंदी असणारी रूढी-परंपरा आज महिलांनी संघटित होऊन मोडीत काढली. ग्रामीण भागातील महिलांनी संघटित होऊन पुकारलेल्या या  परिवर्तनाच्या लढ्याचे सर्वत्र स्वागत होत आहे, अशा भागवाना आता धानोरा गावातील नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. 

महत्वाच्या बातम्या

नितीन गडकरी आणि माझे विचार भव्य-दिव्य, त्यामुळे आमचे विचार जुळतात: राज ठाकरे  

आधी लग्न करून बघा, मग संसार काय असतो ते कळेल; रामदास कदमांचा आदित्य ठाकरेंना टोला  

Related posts