Pune Accident Container Driver Dies In Accident With Shivshahi Bus( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Accident : पुण्यात (Pune) एसटी महामंडळाच्या शिवशाही बस (Shivshahi Bus) आणि कंटेरचा भीषण अपघात झाला. या अपघातात कंटेनरच्या चालकाचा मृत्यू झाला तर दोन  ते तीन प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना प्राथमिक उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघात एवढा भीषण होता की धडकेत कंटेनर आणि शिवशाही बसच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला.

पुणे-सासवड रस्त्यावर असलेल्या उरळी देवाची गावालगत रात्री उशिरा हा अपघात झाला. इथून जवळ असलेल्या गोडाऊनमधून निघालेला कंटेनर सासवडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या पंढरपूर-पुणे एसटीच्या आडवा आला. या अपघातात शिवशाही बसचा चालक आणि त्यामधील प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत. एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी एबीपी माझाला ही माहिती दिली.

Related posts