पुण्यात शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात, सहाजण जखमी, एक गंभीर( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे-सासवड रोडवरील ऊरळी देवाची येथे शिवशाही बस आणि कंटेनरची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण जखमी झाले असून, त्यापैकी एक गंभीर जखमी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पुणे सासवड रोडवरील उरुळी देवाची येथील हॉटेल सोनाईजवळ बस (MH14 GO 3104) आणि कंटेनरमध्ये (MH18 AA 7190) जोरदार धडक झाली. ही बस पंढरपूर येथून स्वारगेटला निघाली होती. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातात सहाजण झाले आहे. जखमींमधील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

अपघातानंतर काही काळासाठी उरुळी देवाची फाट्याजवळ वाहतूक कोंडी झाली होती. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त शिवशाही बसला रस्त्यावरुन बाजूला हटवण्यात आलं. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Related posts