Maharashtra Breaking News Live Updates 19 September 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर…( प्रगत भारत । pragatbharat.com)
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी…  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू…

संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तसेच त्यांनी दखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

पालघरमधील साधू हत्येच्या तपासाबाबत सुनावणी
पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी
राज्यातील १६ जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल पार पडल्या. त्यातील 61 जागा बिनविरोध निवडून आल्या. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु होईल.

राज ठाकरेंचा नागपूर, चंद्रपूर दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते नेतेमंडळींच्या भेटी घेणार आहेत.

शरद पवार सौलापूर दौऱ्यावर
शरद पवार यांच्या हस्ते कुर्डुवाडी पंचायत समितीमध्ये  आ. कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

उस्मानाबादच्या कळंबमध्ये आज मराठा आरक्षण मोर्चा
कळंबमधील विद्याभवन हायस्कूल ते तहसील कार्यालय या मार्गावर  सकाळी ११ वाजता मराठा आरक्षण मोर्चा निघणार आहे.

मनसेच्या वतीने कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर तिरडी मोर्चा
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर महामार्गावर असलेला किणी टोल नाका बंद करावा यासाठी मनसेनं लढा उभा केला आहे. आज मनसेच्या वतीने किणी टोल नाक्यावर तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीचे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर आंदोलन
फोक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून फर्ग्युसन महाविद्यालयासमोर सकाळी 11.30 वाजता आंदोलन होणार आहे.

Related posts