India Eyes To Reach Their 10th U19 Cricket World Cup 2024 Final Ind 19 Vs Sa U19 Semi Final Clash Today Uday Saharan Raj Limbani Musheer Khan

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indian Cricket Team In U19 World Cup 2024 : अंडर 19 विश्वचषकात भारतीय युवा (Team India) संघाची विजयी घौडदौड सुरुच आहे. उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वातील भारतीय संघासमोर आज यजमान दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान असेल. सेमीफायनलच्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये लढत होणार आहे. भारतीय संघाने सलग पाच सामन्यात विजय मिळवत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला आहे. आज दुपारी दीड वाजता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये लढत होणार आहे. भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार म्हटले जातेय. 

उदय सहारनच्या (Uday Saharan) नेतृत्वातील भारतीय संघाने नेपाळचा 132 धावांनी पराभव करत सेमीफायनलमध्ये (Semi Final) प्रवेश केला होता. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने श्रीलंकेचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आज दोन्ही संघामध्ये सेमीफायनलचा सामना होणार आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजयाचा दावेदार म्हटले जातेय. अंडर 19 विश्वचषकात भारतीय संघ आतापर्यंत अजेय आहे. आजच्या सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत फायनलमध्ये प्रवेश कऱण्याच्या इराद्याने युवा संघ मैदानात उतरेल.  भारतीय संघाने आतापर्यंत 9 वेळा फायनलमध्ये प्रवेश केलाय. आज विजय मिळवत दहाव्यांदा फायनल गाठण्याचा इरादा टीम इंडियाचा असेल. 

आतापर्यंत टीम इंडियाचा प्रवास कसा राहिलाय ?

अंडर  19 विश्वचषकात युवा भारतीय सघाचा (IND U19 vs SA U19) दबदबा राहिला आहे. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने आतापर्यंत एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. सलग पाच सामन्यात विजय मिळवत टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. युवा ब्रिगेडचा सामना आता दक्षिण आफ्रिका संघाविरोधात होणार आहे. भारतायी संघाने आतापर्यंत बांगलादेश, आयर्लंड, अमेरिका, न्यूझीलंड आणि नेपाळ संघाचा पराभव केला. भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये आता दक्षिण आफ्रिका संघाला रोखावं लागणार आहे. उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघापुढे हे तगडं आव्हान असेल. भारताच्या संघाने आतापर्यंत सर्वच क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केली आहे.  

उदय सहारनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने बांगलादेशविरात विश्वचषकाच्या अभियानाची सुरुवात केली होती. पहिल्याच सामन्यात युवा ब्रिगेडने 84 धावांनी विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 201 धावांनी सुपडा साप केला. तिसऱ्या सामन्यात भारताने अमेरिकेला 201 धावांनी नमवलं. न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव करत टीम इंडियाने विजयाचा चौकार लगावला.  पाचव्या सामन्यात नेपाळचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. भारतीय संघाने तीन सामने 200 पेक्षा जास्त धावांनी जिंकले आहेत. आता सेमीफायनलमध्ये भारताचा सामना यजमान दक्षिण आफ्रिकाविरोधात होणार आहे. यजमानांना रोखण्याचं भारतापुढे मोठं आव्हान असेल.

[ad_2]

Related posts