Powerful Rajyog Planet Transits in September 2022 Grah Gochar

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Planet Transits in September 2022 : ज्योतिषशास्त्रामध्ये (Astro) प्रत्येक ग्रहाच्या परिवर्तनानं, त्याच्या गतीच्या बदलानं परिस्थितीमध्येही बदल होतात असं स्पष्ट सांगण्यात आलं आहे. ही परिस्थिती म्हणजे अमुक एका व्यक्तीच्या आयुष्यावर होणारे थेट परिणाम. यंदाच्या वर्षी 24 सप्टेंबर या दिवशी ग्रहांची एक अदभूत स्थिती पाहायला मिळणार आहे. ज्यामुळं 5 राजयोग तयार होत आहेत. जवळपास 59 वर्षांनंतर हा योग तयार झाला आहे. ज्या दिवशी शनी, बुध, गुरु वक्री असतील. या दिवशी नीच भंग राजयोग, बुधादित्य राजयोग, भ्रद राजयोग आणि हंस राजयोग (Rajyog) साकारला जाणार आहे. या राजयोगांचे परिणाम 5 राशींवर दिसणार आहेत. (Powerful Rajyog Planet Transits in September 2022 Grah Gochar)

वृषभ- या राजयोगानं वृषभ राशीसाठी धनलाभाची परिस्थिती तयार होत आहे. शनी संबंधित व्यापाऱ्यांसाठी हा काळ वरदानाहून कमी नाही. शेअर, लॉटरीमध्ये गुंतवणूक करु शकता. 

मिथुन- करिअरमध्ये यश मिळणार आहे. व्यापाराठीही चांगला काळ आहे. राजकीय क्षेत्रात सक्रीय असणाऱ्यांना एखाद्या मोठ्या पदाची जबाबदारी मिळू शकते. प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळणार आहे. 

कन्या- कामात यश मिळणार आहे. अचानकच धनलाभ होण्याची शक्यता आहे. मीडियाशी संबंधित क्षेत्रातील लोकांना धनलाभ होणार आहे. अडकलेली कामं पूर्णत्वास जाणार आहेत. नशिबाची साथ मिळेल. 

धनु- व्यवसायासाठी सध्याचा काळ पूरक आहे. नव्या कामात गुंतवणूक करु शकता. कामाच्या निमित्तानं प्रवासाचा योग आहे. धनलाभ होणार आहे. 

मीन- सध्याचा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. नव्या कामाची संधी मिळणार आहे. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळण्याचीही संधी मिळू शकते. व्यापारवृद्धिची संधी आहे. एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवातही करु शकता. 

(वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारित आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही)

Related posts