Shreyas Iyer May Out To Team India For England Test Series Ajit Agarkar Lands In Vizag To Discuss Squad For Rest Of The Series

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Team India announced for England Series : विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडचा (IND vs ENG) 106 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय संघाने (Team India) पाच सामन्याच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. उर्वरित 3 कसोटी सामन्यासाठी आज भारतीय संघाची निवड (Team india selection) होण्याची शक्यता आहे. निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर सोमवारी विशाखापट्टणम येथे पोहचले आहेत. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर भारतीय चमूची निवड जाहीर होणार आहे. (India Squad For Remaining 3 Tests against england

श्रेयस अय्यरचा पत्ता कट होणार ?

मागील काही दिवसांपासून युवा श्रेयस अय्यर याला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. अय्यर सातत्याने फ्लॉप जात आहे. अय्यरला साधे अर्धशतकही ठोकता आले नाही. त्यामुळे संघातून त्याला वगळण्यात येऊ शकते. मागील 12 डावात श्रेयस अय्यर खराब फॉर्ममध्ये आहे. यादरम्यान त्याला एकही अर्धशतक ठोकता आले नाही. अय्यर याच्या नावावर फक्त एका शतकाची नोंद आहे. पदार्पणात अय्यर याने शतक ठोकले होते. त्यावेळी अय्यरने पहिल्या डावात 105 आणि दुसऱ्या डावात 65 धावांची खेळी केली होती. पण त्यानंतर अय्यरला एकही शतक ठोकता आले नाही. मागील 12 डावात अय्यर फ्लॉप गेलाय. त्यामुळे उर्वरित तीन कसोटी सामन्यातून अय्यरला वगळले जाऊ शकते. 

विराट कोहली, केएल राहुलचं कमबॅक ?

अजीत आगरकर यांची रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर उर्वरीत तीन कसोटी सामन्यासाठी संघाची निवड करण्यात येईल. विराट कोहली आणि केएल राहुल यांचं कमॅबक होण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यातून विराट कोहलीने माघार घेतली होती. तर पहिल्या कसोटी सामन्यानंतर राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याला तो मुकला होता. त्यामुळे केएल राहुल आणि विराट कोहली यांचं कमबॅक होऊ शकतो. 

भारताने मालिकेत बरोबरी साधली – 

रोहित शर्माच्या भारतीय संघानं विशाखापट्टणमच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 106 धावांनी धुव्वा उडवला. भारतीय संघानं या विजयासह पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. या कसोटीत भारतानं इंग्लंडला विजयासाठी 399  धावांचं आव्हान दिलं होतं. पण आदल्या दिवशीच्या एक बाद ६७ धावांवरून इंग्लंडचा दुसरा डाव 292 धावांत आटोपला. भारताकडून जसप्रीत बुमरानं 46 धावांत तीन आणि रवीचंद्रन अश्विननं 72 धावांत तीन फलंदाजांना माघारी धाडलं. मुकेशकुमार, अक्षर पटेल आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी एक विकेट काढली. जसप्रीत बुमराला या कसोटीतल्या सर्वोत्तम खेळाडूचा मान देण्यात आला. त्यानं पहिल्या डावात सहा आणि दुसऱ्या डावात तीन फलंदाजांना माघारी धाडलं.

उर्वरित 3 कसोटी सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ – 

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, केएल राहुल, विराट कोहली/श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, वाशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि जसप्रीत बुमराह.

[ad_2]

Related posts