agra masheri divorce case due to tobacco manjan husband wife relation on verge of divorce



( प्रगत भारत । pragatbharat.com)

Agra : उत्तर प्रदेशातील आग्रा (Agra) येथील एका पती-पत्नीचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं आणि यामागचं कारण मात्र एकदमच भयानक आहे, जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. आपली पत्नी नेहमी मशेरी घेऊन दात घासत बसते, ही सवय पतीला आवडली नाही आणि त्यामुळे त्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं. दात घासण्यासाठी टूथपेस्ट वापर, असं अनेकदा सांगूनही पत्नीने ऐकलं नाही आणि ती तिचीच मनमानी करत राहिली. शेवटी होत्याचं नव्हतं झालं आणि दोघांच्या नात्यात दुरावा आला. 

मशेरी लावण्यावरुन पती-पत्नीमध्ये वाद

मशेरीमध्ये तंबाखूची नशा असल्याचं नवऱ्याचं म्हणणं आहे. असं म्हणत त्याने पुढे आरोप केला की, त्याची पत्नी दिवसातून एकदा नव्हे, तर तीन वेळा मशेरी लावते आणि नंतर इकडे तिकडे गरागरा फिरत राहते. पतीने अनेकदा नकार दिल्यानंतरही पत्नीने त्याचं ऐकलं नाही, त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर पतीने पत्नीला घराबाहेर हाकलून दिलं.

मागील दोन महिन्यांपासून बायको माहेरी

पत्नीच्या मशेरी लावण्याच्या सवयीवर पती नाराज झाला आणि त्याने तिला माहेरी हाकललं. गेल्या 2 महिन्यांपासून ती तिच्या माहेरच्या घरी राहत होती. नात्यात दुरावा आल्यानंतर हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचलं. मालपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या तरुणीचं त्याच परिसरातील तरुणाशी लग्न झालं होतं. लग्नाच्या 8 महिन्यांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

पत्नीच्या या सवयीमुळे प्रकरण घटस्फोटापर्यंत

कौटुंबिक समुपदेशन केंद्रात पतीने सांगितलं की, जर तिने मशेरीने दात घासणं बंद केलं तर तो तिला घरी परत बोलवेल. पण बायको मशेरी सोडायला तयार नाही. कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे समुपदेशक डॉ.अमित गौड यांनी सांगितलं की, पत्नी अमली पदार्थांच्या आहारी गेली आहे आणि त्यामुळे पतीने तिला घराबाहेर हाकलून दिलं. पतीने पत्नीला तिहेरी तलाकबद्दलही सांगितलं. या दोघांना समजावून सांगण्यात आलं आणि घरी पाठवण्यात आलं. पुढील तारखेला पती-पत्नीला बोलावण्यात आलं आहे, या वेळी काय निर्णय होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

महाराष्ट्रातही अनेक गृहिणींना मशेरीने दात घासण्याची सवय आहे, ज्यामुळे त्यांच्या घरात अनेकदा वाद होतात. मशेरी हा तंबाखूजन्य पदार्थ असून तो शरीरासाठी घातक आहे, हे प्रत्येकानेच लक्षात घेतलं पाहिजे.

हेही वाचा: 

Instagram Pay : तुम्हालाही आहे इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करण्याची आवड? आता प्रत्येक रील, पोस्टमागे कमवता येणार हजारो रुपये

 

अधिक पाहा..

Related posts