EVM machine theft Control unit of EVM machine stolen from Saswad Tehsil office marathi news

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

EVM Machine Control Unit Theft : ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिटची चोरी  झाली आहे. सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्रॉंगरूम मध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. याबाबत सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दोन दिवस शनिवार आणि रविवारी तहसील  कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्रॉंग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिट चोरी गेले आहे.. ईव्हीएम मशीनच्या कंट्रोल युनिट चोरी गेले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे . यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

अधिक पाहा..

[ad_2]

Related posts