FCI Recruitment | Food Corporation Of India | FCI Job Opportunity( प्रगत भारत । pragatbharat.com)

FCI Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारतीय खाद्य महामंडळ (Food Corporation Of India) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

फूड कॉर्पोरेशन इंडिया अंतर्गत इंजिनीअर (Engineer), स्टेनोग्राफर (Stenographer) आणि असिस्टंट कॅटगरी-III (Assistant Category) पदाच्या एकूण ५९८३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

सिव्हिल इंजिनीअर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगची डिग्री किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.

स्टेनोग्राफर पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण असावे. उमेदवाराला ४० शब्द प्रति मिनिट इंग्रजी तर ८० शब्द प्रति मिनिट शॉर्टहॅण्डचा वेग असणे आवश्यक आहे.

असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण असावे. तसेच उमेदवाराला कॉम्प्युटरची बेसिक माहिती असावी.

BOI Recruitment: आठवी, दहावी ते ग्रॅज्युएट सर्वांना बॅंकेत नोकरीची संधी; ‘येथे’ पाठवा अर्ज
देशातील विविध राज्यांमध्ये ही भरती केली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई/ ठाणे/एमएमआर रिजन, नवी मुंबई, नागपूर, अमरावती, नांदेड, पुणे येथे ही भरती केली जाणार आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
उमेदवारांनी अर्ज करताना ५०० रुपये शुल्क भरायचा आहे. याची अर्ज प्रक्रिया ६ सप्टेंबरपासून सुरु झाली असून ५ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. बातमीखाली अर्जाची थेट लिंक देण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Government Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट पदांची भरती, मुंबईत सरकारी नोकरीची संधी
NABARD मध्ये बंपर भरती, पदवीधर असाल तर ‘येथे’ पाठवा अर्ज

Related posts