Maharashtra, Shiv Sena, Sharad Pawar, Dasara Melava 2022, BJP, Eknath Shinde, Uddhav Thackeray,( प्रगत भारत । pragatbharat.com)

Sharad Pawar On Dasara Melava: मुंबईतील (Mumbai) शिवजी पार्कवर (Shivaji Park) शिवसेनेकडून (Shiv Sena) भव्य दसरा मेळावा आयोजित केला जातो. त्यासाठी दरवर्षी राज्यातून हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल होत असतात. दरम्यान, शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये अजूनही रस्सीखेच सुरू आहे. दोन्ही गटांकडून बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी मिळावी, म्हणून महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आले. यावर महापालिकेनं निर्णय घेत बीकेसी मैदानावर दसरा मेळावा घेण्यासाठी शिंदे गटाला परवानगी दिलीय. मात्र, अद्याप ठाकरे गटाला दसरा मेळाव्याकरता कोणत्याच मैदानाचा अर्ज मंजुर झालेला नाही. ज्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.

“दसरा मेळावा राजकीय पक्षाला कार्यक्रम घेण्याला विरोध आजपर्यंत कुणी केला नाही. शिवाजी पार्क म्हणजे बाळासाहेब ठाकरे, असं गणित आहे. त्यामुळं खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचीच आहे. शिंदेंना बीकेसीचं मैदान दिलंय. आता त्यांनी विरोध करू नये”, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

Related posts