India vs Australia T20I Series; Salary of Team India Players is Far Behind that of Australian Players( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मंगळवारपासून ३ सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. पुढील महिन्यात १६ तारखेपासून ऑस्ट्रेलियात आयसीसी टी-२० वर्ल्डकप होणार आहे. अशात ही मालिका वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. भारतीय निवड समितीने या मालिकेत अशा खेळाडूंना निवडले आहे जे पुढील महिन्यात टी-२० वर्ल्डकपचा भाग असतील.

दोन्ही संघांच्या पगारात मोठा फरक

दोन्ही संघातील टी-२० मालिकेच्या आधी जाणून घेऊयात खेळाडूंच्या पगाराबद्दल, भारतीय खेळाडूंना एका कसोटीसाठी १५ लाख रुपये मिळतात. वनडेसाठी ६ लाख तर टी-२०साठी ३ लाख रुपये. जर खेळाडू अंतिम ११मध्ये नसेल तर त्याला वरील रक्कमेच्या ५० टक्के रक्कम दिली जाते.

वाचा- रोहितने सलामीच्या जोडीचा वाद संपुष्टात आणला; पाहा विराट कोहलीबाबत काय म्हणाला…

या उटल ऑस्ट्रेलियामध्ये एका खेळाडूला १८ हजार ऑस्ट्रेलियन डॉलर दिले जातात. जवळ जवळ १४.३३ लाख रुपये. एका वनडेसाठी ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना ३.७४ लाख रुपये तर टी-२० साठी १.९४ लाख रुपेय दिले जातात. क्रिकेटच्या तिनही फॉर्मेटमध्ये भारतीय खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना अधिक पगार दिला जातो.

बीसीसीआयकडून प्रत्येक वर्षी खेळाडूंसोबत केंद्रीय करार केला जातो. या करारात ए प्लस, ए, बी आणि सी असे प्रकार आहेत. ए प्लस खेळाडूंना ७ कोटी, ए वर्गातील खेळाडूंना ५ कोटी, बी वर्गातील खेळाडूंना ३ कोटी तर सी वर्गातील खेळाडूंना १ कोटी दिले जातात. खेळाडू ज्या वर्गात असतील त्यांना निश्चितपणे तितकी रक्कम मिळते.

वाचा- बजरंग पुनियाने रचला इतिहास,जागतिक कुस्ती स्पर्धेत इतकी पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू

रोहित-विराट पेक्षा कमिंन्सची पगार जास्त

ऑस्ट्रेलिया बोर्डाकडू केंद्रीय करार केला जातो. त्यानुसार पॅट कमिंन्सला जवळ जवळ १०.७० कोटी रुपेय दिले जातात. त्यानंतर जोश हेजलवूड यांचा क्रमांक लागतो, त्याला ८.५६ कोटी रुपये दिले जातात. डेव्हिड वॉर्नरला ८.२ कोटी, मिचेल स्टार्कला ७.४९ कोटी मिळतात. विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या स्टार खेळाडूंच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा वार्षिक पगार जास्त आहे. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन सारख्या खेळाडूंचा पगार केएल राहुल आणि रविंद्र जडेजापेक्षा अधिक आहे.

Related posts