ongc recruitment, ONGC मध्ये प्रशिक्षणासोबत मिळेल पगार, बारावी ते पदवीधरांनी पाठवा अर्ज – ongc recruitment vacancy under oil and natural gas corporation( प्रगत भारत । pragatbharat.com)

ONGC Recruitment: बारावी ते पदवीधर असलेल्या आणि चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ, मुंबई (Oil and Natural Gas Corporation, Mumbai) येथे अकाऊंट एक्झिक्युटिव्ह अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज (ONGC Recruitment Apply) ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. सदर भरती करिता नोकरी ठिकाण मुंबई आहे.

ओएनजीसी अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण ४० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. बारावी पास (कॉमर्स), पदवीधर, पदवीधर (बीबीए) उमेदवार प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करु शकतात. अर्ज करणाऱ्या नॉन कॉमर्स विद्यार्थ्यांकडे २ ते ३ वर्षाचा फायनान्सचा अनुभव असणे आवश्यक आहे.

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
पदभरतीचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. याची थेट लिंक बातमीखाली देण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

NABARD मध्ये बंपर भरती, पदवीधर असाल तर ‘येथे’ पाठवा अर्ज
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

प्रशिक्षणार्थींना आठवड्यातील ५ दिवस काम करावे लागणार आहे. दिवसाचे ७ तास काम असेल. प्रशिक्षणाचा कालावधी १३ महिन्यांचा असेल. प्रशिक्षणार्थी उमेदवारांना दरमहा ७ हजार ते ९ हजार रुपये इतका स्टायपेंड दिला जाणार आहे.

प्रशिक्षणार्थी पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज
Government Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट पदांची भरती, मुंबईत सरकारी नोकरीची संधी

Related posts