crocin new medicine, ‘डोलो ६५०’ ला घाबरून बाजारात आली नवी गोळी; जाणून घ्या काय आहे प्रकरण – crocin scared of dolo 650 now new medicine launched in the market know what is the matter( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: मायक्रो लॅब्स या बेंगळुरू येथील कंपनीची डोलो ६५० ही गोळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ही एक पॅरासिटामॉलची गोळी असून तिचा वापर तापावर केला जातो. करोना काळात डोलो ६५० ची मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. विक्रीच्या बाबत या औषधाने अन्य सर्व औषधांना मागे टाकले.

औषध विक्रीबाबत डोलो ६५० अव्वल स्थानी पोहोचली आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार करोना काळात डोलोच्या ३५० कोटी गोळ्यांची विक्री झाली. या गोळ्यांची विक्री करून मायक्रो लॅब्स लिमिटेडने जवळ जवळ ६०० कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान कंपनीवर असा आरोप झाला होता की त्यांनी डॉक्टरांना भेट वस्तू दिल्या होत्या, जेणेकरून ते रुग्णांना डोलो गोळ्या घेण्यास सांगतील.

वाचा- जावयासाठी गुजराती समाजाला आरक्षण दिले; महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी

डोलो गोळ्यांची विक्रमी विक्री झाल्यानंतर आता क्रोसिनने देखील क्रोसिन ६५० या नावाने नवी गोळी बाजारात आणली आहे. यामुळे असे प्रश्न विचारले जात आहे की, डोलोमुळे क्रोसिन घाबरले आणि त्यांनी विक्री वाढवण्यासाठी डोलो प्रमाणेच ६५० ही गोळी बाजारात आणली.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने डोलो-६५०ची निर्मिती करणाऱ्या कंपनीवर गंभीर आरोप केला होता. विक्री वाढवण्यासाठी डॉक्टरांना १ हजार कोटी रुपयांचे गिफ्ट दिल्याचा आरोप करण्यात आला होता. आयकर विभागाने ६ जुलै रोजी बेंगळुरू येथील मायक्रो लॅब्स लिमिटेडच्या ९ राज्यातील ३६ ठिकाणी छापे टाकले होते. ३६ ठिकाणी टाकलेल्या छाप्यानंतर संबंधित दावा केला होता.

वाचा- रोहितने सलामीच्या जोडीचा वाद संपुष्टात आणला; पाहा विराट कोहलीबाबत काय म्हणाला…

सीबीडीटीने दिलेल्या माहितीनुसार कंपनी विरोधात कारवाई केल्यानंतर १.२० कोटी इतकी रोख रक्कम जप्त केली होती. त्या बरोबर १.४० कोटी रुपयांचे सोने आणि हिरो जप्त करण्यात आले होते. या कारवाईनंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणी पुढील सुनावणी २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. आता क्रोसिनने क्रोसिन ६५० नावाने नवी गोळी बाजारात आणली आहे. क्रोसिनला डोलोला टक्कर द्यायची आहे. करोना काळात डोलोची झालेली विक्रमी विक्रीनंतर क्रोसिनने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

Related posts