Rohit Sharma Gives Funny Reaction After Reporter Asks Him Question See Video( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rohit Sharma in IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 20 सप्टेंबरपासून टी20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिल सामना मोहाली येथे पार पडणार आहे. यासाठी भारतीय संघ (Team India) सामन्याच्या ठिकाणी पोहोचला आहे. दरम्यान सामन्यांपूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी त्याला एका पत्रकाराने बराच मोठा प्रश्न विचारला, ज्यानंतर कर्णधार रोहितनं अगदी नॅचरल पण अत्यंत मजेशीर अशी रिएक्शन दिली, रोहितच्या याच रिएक्शनचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. 

नेमका काय आहे व्हिडीओ?

रोहित शर्मा सध्या मोहालीमध्ये भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (India vs Australia T20 Series) टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. मालिकेपूर्वी कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकरांना त्याला विविध प्रश्न विचारले. अंतिम 11 तसंच भारतासाठी विराट कोणत्या जागेवर खेळणार, सलामीची जोडी कोणती असे विविध प्रश्न विचारले. याचदरम्यान एका पत्रकाराने रोहितला एक अत्यंत मोठा प्रश्न विचारला. ज्या प्रश्नानंतर रोहितने हसत त्याला ”किती प्रश्न विचारता यार?” अशी रिएक्शन दिली… रोहितचा हाच सिंपल अंदाज चाहत्यांनाही आवडला असून विविधजण हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

पाहा व्हिडीओ-

सलामीवीरांच्या जोडीबद्दल रोहित काय म्हणाला?

या प्रेस कॉन्फरन्समध्ये भारताकडून सलामीवीरांची जोडी कशी असेल? याबाबत रोहितनं माहिती दिली. यावेळी त्याने केएल राहुल हाच सलामीवीर असणार असून विराट कोहली (Virat Kohli) हा संघासाठी तिसरा सलामीवीर असेल असं रोहितनं स्पष्ट केलं आहे. कोहलीच्या ओपनिंगबाबत बोलताना रोहित म्हणाला,”विराट कोहली आमच्यासाठी तिसरा ओपनर आहे. तो काही सामन्यांत नक्कीच सलामीला येईल. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याचा फॉर्म जबरदस्त होता. आम्ही यामुळे आनंदी आहोत. पण मी हे स्पष्ट करु इच्छित आहे की, केएल राहुल हाच विश्वचषकात सलामीवीर असणार आहे.” 

हे देखील वाचा- Related posts