madhuri dixit and Sanjay Dutt Love story, एकेकाळी माधुरी दीक्षित व संजय दत्तच्या लव्हस्टोरीच्या झडल्या होत्या जगभरात चर्चा, ‘त्या’ एका घटनेने तुटले नाते – what is the real reason behind the end of madhuri dixit and sanjay dutt interesting love story( प्रगत भारत । pragatbharat.com)

संजय दत्त (sanjay dutt) आणि माधुरी दीक्षित (Madhuri dixit) ही आज देखील अनेकांची फेव्हरेट जोडी आहे आणि त्याचे कारण म्हणजे ‘साजन’ (sajan movie) हा चित्रपट होय. आज संजय आणि माधुरीला तुम्ही पाहिलेत तर त्यांची जोडी एवढी भारी वाटली नसती असे तुम्हाला वाटेल पण तरूण वयातला हँडसम संजय आणि रूपवान माधुरी यांची केमिस्ट्री तेव्हा अनेकांना आवडली होती.

आता दोघेही आपापल्या संसारात खुश आहेत. रममाण आहेत. पण समजा आम्ही तुम्हाला सांगितलं की संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची सुद्धा एक रियल लाईफ लव्हस्टोरी होती, तर तुम्हाला विश्वास बसेल का? अहो, हे अगदी खरं आहे. ही एक अधूरी प्रेमकहाणी ठरली जी अनेक फेल लव्हस्टोरीजप्रमाणे फसली. पण ही प्रेमकहाणी जाणून घेण्यात मात्र अगदीच इंटरेस्टिंग आहे. 2 मोठ्या हस्तींची लव्हस्टोरी ऐकायला कोणाला उत्सुकता नसेल म्हणा..!

साजन चित्रपट ठरला कारण

साजन चित्रपटावेळीच संजय दत्त आणि माधुरी दीक्षित एकमेकांच्या जवळ आले होते. दोघांच्या अफेअरच्या चर्चा सेट वरून बाहेर आल्या आणि रंगू लागल्या. हे प्रेम एवढे घट्ट झाले होते की संजय दत्तने असे म्हटले होते की माधुरी जर दूर झाली तर मला जगणे सुद्धा अशक्य आहे. पण म्हणतात ना जसं आपण ठरवतो तसचं सगळं होत नाही आणि नशीब आपल्याला रडवायला तयार असतं. असंच काहीसं घडलं.

(वाचा :- पुरूषहो, बॉयफ्रेंड कोणीही चालेल पण नवरा बघताना या गोष्टी नोटीस करतात मुली, 3 नंबरवरील मुली सहजासहजी पटणं अशक्यच)

घरच्यांना मान्य नव्हतं हे नातं

जेव्हा दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या आणि त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या. तेव्हा संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी मात्र असे काहीही नसल्याचे सांगत या नात्यालाच विरोध केला. त्यांनी असे केले कारण संजय हा आधीच विवाहित होता. विवाहित असून सुद्धा तो माधुरीच्या प्रेमात पडला होता. माधुरीच्या घरच्यांना देखील याच गोष्टीशी प्रॉब्लेम होता. पण दोघे प्रेमात एवढे बुडाले होते की त्यांनी भेटणे सुरु ठेवले.

(वाचा :- माझी कहाणी : मी ज्या मुलीवर आकंठ प्रेम केलं ती माझी वहिणी बनणार आहे, भावाने माझं प्रेम व पत्नी दोन्ही हिरावलं..)

एक टर्निंग पॉइंट

संजय दत्तचा खलनायक चित्रपट रिलीज झाला आणि संजय दत्त त्या जमानातल्या सुपरस्टार झाला. लोकांनी हा पिक्चर डोक्यावर उचलून धरला. संजयसाठी हा काळ खूपच भरभराटीचा होता. पण यात मिठाच खडा पडावा तशी घटना घडली. संजय दत्त विरोधात पोलिसांनी कारवाई केली. तेव्हा तो विदेशात शुटींगला होता. ही बातमी कळताच तो परत आला आणि आल्या आल्या त्याला पोलिसांनी उचलले. टाडा अंतर्गत त्याला अटक झाल्याने या घटनेचा धक्का माधुरीला देखील बसला.

(वाचा :- सचिन तेंडूलकर व अंजलीची लवस्टोरी ऐकून भारावाल, क्रिकेटचा ‘क’ माहिती नसणा-या मुलीसमोर का विरघळला क्रिकेटचा देव?)

नातं कायमचं संपलं

या पुढचा काळ संजय दत्तसाठी भयंकर वाईट ठरला होता. अख्खं दत्त कुटुंब यात भरडलं गेलं. संजयवर देशद्रोहाचा ठपका बसला. केस सुरूच होती, पण निकाल लागला नव्हता. आणि यातून संजय दत्त सुटण्याची शक्यता अजिबात नव्हती. कारण गुन्हा तर घडला होता. त्यामुळेच माधुरीने स्वत:ला सावरत संजयचा नाद सोडला. ती संजय पासून दूर झाली ती कायमचीच, आणि काही काळाने तिने श्रीराम नेने यांच्याशी लग्न केले आणि ती अमेरिकेत सेटल झाली.

(वाचा :- पार्टनरच्या झोपण्याच्या स्टाइलवरून ओळखू शकता त्याची पर्सनॅलिटी व स्वभाव, बघा या टेस्टमधून जुळतं का तुमचं नातं.!)

अधुरी प्रेमकहाणी

ही प्रेमकहाणी यशस्वी झाली असती तर आज आपल्याला वेगळे संजय आणि माधुरी पहायला मिळाले असते. पण म्हणतात न नियतीच्या मनात जे असते तेच होते. अनेकांनी त्यांचे अफेअर सुरू असल्याचे कळताच असे म्हटले होते की, हे नाते तुटले तर बरे होईल कारण संजय दत्त सोबत माधुरीला भविष्य नाही. कदाचित असेही होऊ शकले असते. म्हणूनच की काय वेळीच ती दूर झाली असावी आणि तिला देखील संजय सोबत आपलं भविष्य अंधकारमय वाटलं असावं. जे झालं ते झालं पण आज दोघे आपापल्या संसारात सुखी आहेत ही अधुरी प्रेमकहाणी मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात कायमची दडवून यातच सगळं काही आहे.

(वाचा :- माझी कहाणी : मी 26 वर्षांची मुलगी आहे व मला लग्न करायचं आहे, पण समाज माझ्या लग्नाला तुच्छ व पाप मानतो कारण…!)

Related posts