Software Support Engineer Recruitment in Yawatmal Collector Office( प्रगत भारत । pragatbharat.com)

Collector Office Recruitment: कलेक्टर ऑफिसमध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. यवतमाळ
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये (Collector Office Recruitment) सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअर पदाची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

यवतमाळ कलेक्टर ऑफिसमध्ये (Yawatmal Collector Office) सॉफ्टवेअर सपोर्ट इंजिनीअरचे १ पद (Software Support Engineer) भरले जाणार आहे. या पदासाठी कोणतीही परीक्षा होणार नसून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीई/बीटेक इन कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजीपर्यंतचे शिक्षण घेतलेले असावे. उमेदवारांना शासकीय सेवेत काम केल्याचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. स्थानिक रहिवाशांना नोकरीत प्राधान्य दिले जाणार आहे.

Yavatmal Collector Office Recruitment 2022: पदभरतीचा तपशील जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

NABARD मध्ये बंपर भरती, पदवीधर असाल तर ‘येथे’ पाठवा अर्ज
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

२४ सप्टेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ (सेतू विभाग) या पत्त्यावर पाठवायचे आहेत. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

FCI Recruitment: भारतीय खाद्य महामंडळात बंपर भरती, येथे पाठवा अर्ज
Government Job: दूरसंचार विभागात अकाऊंटंट पदांची भरती, मुंबईत सरकारी नोकरीची संधी

Related posts