ind vs pak match, भारत विरुद्ध पाकिस्तान मॅचनंतर चाहत्यांमध्ये राडा; २७ जणांना अटक पाहा झालं तरी काय – clash between the fans after the india vs pakistan match in uk( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गेल्या महिन्यात आशिया कपमध्ये दोन वेळा लढत झाली. दोन्ही संघात झालेल्या पहिल्या लढतीनंतर ब्रिटनमध्ये चाहत्यांनी तुफान राडा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर शांततेचे आव्हान करण्यात आले आहे.

आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीनंतर इंग्लंडमधील लीसेस्टर शहरात दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. सोशल मीडियावर आलेल्या रिपोर्टनुसार या आठवड्याच्या अखेरीस एका निदर्शने देखील करण्यात आली त्यामुळे प्रकरण आणखी वाढले.

वाचा- रोहितने सलामीच्या जोडीचा वाद संपुष्टात आणला; पाहा विराट कोहलीबाबत काय म्हणाला…

लीसेस्टर पोलिस दलाचे मुख्य कॉन्सटेबल रॉब निक्सन यांनी एका व्हिडिओ शेअर केला आहे. आम्हाला शहरांच्या पूर्व भागात काही गडबड सुरू असल्याचे बातमी कळाली आहे. आम्ही संबंधित ठिकाणी अधिकारी पाठवले असून परिस्थिती नियंत्रणात आहे. अजून अतिरिक्त अधिकारी घटनास्थळी जाणार आहेत. कृपया अशा प्रकारात सहभागी होऊ नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाचा-युवीने रचलेल्या इतिहासाला १५ वर्षे पूर्ण, खास व्यक्तीसोबत पाहिले त्या सामन्याचे हायलाइट्स, पाहा VIDEO

स्थानिक पोलिस दलाने सांगितले की, अधिकारी मोठ्या संख्यने घटनास्थळी पोहोचले आहे. परिसरात शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांची तपासणी सुरू आहे. दोघांना ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी एकावर हिंसाचाराचा कट आखल्याचा संशय आहे. दुसऱ्याकडे ब्लेड सारखी वस्तू ठेवल्याचा संशय व्यक्त केला जातोय.

वाचा- भारतीय क्रिकेटपटूंचा पगार काहीच नाही; पाहा ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना किती पगार मिळतो

पोलिसांना हिंसाचाराच्या आणि नुकसान केल्याच्या अनेक घटनांची माहिती मिळाली असून त्याची चौकशी सुरू आहे. लीसेस्टर येथील मेल्टन रोडवर धार्मिक इमारतीच्या बाहेर एका व्यक्तीने झेंडा खेचल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आम्ही स्थानिक लोकांच्या नेत्यांशी चर्चा करत आहोत. तसेच त्यांना शांतता राखण्याचे आव्हान कर आहोत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात २८ ऑगस्ट रोजी दुबईत झालेल्या सामन्याच्या आधी असे आदेश दिले होते, असे निक्सन यांनी सांगितले. या प्रकरणी आतापर्यंत २७ जणांना अटक केली आहे.

Related posts