Not Taking Mohammed Shami In Team India For World Cup 2022 Is Big Mistake Says Australias Mitchell Johnson( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mitchell Johnson about team india : लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धा सध्या सुरु असून यामध्ये इंडिया कॅपिटल्स संघात ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज मिचेल जॉन्सन (Mitchell Johnson) खेळत आहे. दरम्यान मिचेल याने लखनौमध्ये एबीपी न्यूजशी बोलताना भारताच्या वर्ल्ड कप टीमबाबत मोठं वक्तव्य केलं. यासोबत ऑस्ट्रेलियाचा नव्या एकदिवसीय संघाच्या कर्णधाराबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. 

‘शमीला संघात न घेणं मोठी चूक ‘

एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना मिचेल जॉन्सन म्हणाला,”भारतीय संघात आणखी एका वेगवान गोलंदाजाची गरज होती. त्यामुळे संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) याला संघात जागा मिळायला हवी होती. त्याला संघात न घेता राखीव खेळाडू ठेवण्यात आलं आहे, ही एक मोठी चूक ठरु शकते. 

‘ऑस्ट्रेलियामध्ये सामने असताना तीन फिरकीपटू घेणं चूकीचं’

जॉन्सन भारताच्या विश्वचषक संघाबाबत बोलताना म्हणाला, “भारतीय निवडकर्त्यांनी आपल्या हिशोबाने एक बॅलन्स संघ निवडला आहे. पण ऑस्ट्रेलियामध्ये सामने आहेत, ऑस्ट्रेलियात बॉल जास्त फिरत नसल्याने तिथे तीन फिरकीपटू घेणं योग्य नाही. याशिवाय ऑस्ट्रेलियात चेंडूना अधिक  बॉऊन्स मिळत असल्याने आणखी एक वेगवान गोलंदाज संघात असायला हवं होता.” 

ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय कर्णधाराबाबतही दिली प्रतिक्रिया

मिचेल जॉन्सनने यावेळी बोलताना ऑस्ट्रेलियाच्या नव्या वनडे कर्णधाराबद्दलही आपली प्रतिक्रिया दिली, तो म्हणाला,”ऑस्ट्रेलियाकडे फारसे पर्याय नाहीत. मिशेल मार्श गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. त्याच्याशिवाय ग्लेन मॅक्सवेल हा देखील चांगला पर्याय असू शकतो. त्याला ऑस्ट्रेलियाचे कर्णधार करणं योग्य ठरु शकतं.” डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथबाबत बोलताना मिचेल म्हणाला, दोघांपैकी कोणालाच कर्णधार करणं योग्य नाही. दोघेही सिनीयर खेळाडू आहेत, त्यामुळे दोघांनी संघाला योग्य मार्गदर्शन द्यायला हवं.” 

आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

हे देखील वाचा- 

Related posts