पोलिसांनी खाकी वर्दीत नाचू नये, अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे आदेश( प्रगत भारत । pragatbharat.com)

गणपती विसर्जनावेळी काही पोलीस खाकी वर्दीत म्हणजे गणवेश घालून नाचतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची दखल राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (ADG) कायदा व सुव्यवस्था कुलवंत सरंगल यांनी घेतली आहे.

कोणत्याही पोलिसाने खाकी वर्दीत गणवेशात नाचू नये, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. गणवेशात नाचताना आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

गणेश विसर्जनादरम्यान वडाळा, लालबाग आणि कोल्हापूर इथं काही पोलीस गणवेशात नाचतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते. तसेच अनेक पोलीस खाकी वर्दीतच विसर्जन मिरवणुकीत नाचताना दिसले होते. व्हायरल झालेल्या या व्हिडीओची दखल घेत पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत.

डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तो अहवाल एडीजी कायदा व सुव्यवस्था कार्यालयात सादर करण्यात आला होता. काही लोकांनी सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले ज्यामध्ये काही पोलीस विसर्जन मिरवणुकीदरम्यान काही गाण्यांवर नाचताना दिसत आहेत.


हेही वाचा

आरेतील रस्ते देखभालीसाठी महापालिकेकडे सोपवा : रवींद्र वायकर

कांदा पुन्हा रडवणार! महाराष्ट्रात महिनाभरात भाव वाढणार

Related posts