Legends League Cricket: Mitchell Johnson Encounters Snake In Hotel Room, Shares Pic On Instagram( प्रगत भारत । pragatbharat.com)

Snake in Mitchell Johnson Room: ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉनसनच्या हॉटेलच्या खोलीत साप निघालाय. जॉनसननं स्वत: सोशल मीडियाद्वारे याबाबत माहिती दिली आहे. मिचेल जॉनसन हा सध्या भारतात असून लीजेंड्स क्रिकेट लीगमध्ये (Legends League Cricket) इंडिया कॅपिटल्सकडून (India Capitals) खेळत आहे. दरम्यान, जॉनसन कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये थांबला असता त्याच्या खोलीच्या दरवाजाजवळ साप निघाला, ज्याचे फोटो त्यानं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्या हंगामात इंडिया कॅपिटल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनच्या हॉटेलच्या खोलीत साप बाहेर निघाला. मिचेल जॉन्सननं स्वतः या सापाचा फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. सापाचा फोटो शेअर करताना जॉनसनं कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, “माझ्या खोलीच्या दरवाज्याजवळ साप आढळला आहे.” तसेच हा कोणत्या प्रकारचा साप आहे? असाही प्रश्न त्यानं क्रिकेट चाहत्यांना विचारलाय. जॉनसननं पोस्ट केलेला हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट-


 

भारताच्या संघ निवडीबाबत मिचेल जॉनसन काय म्हणाला?
“जर तुम्ही संघात एक अष्टपैलू (वेगवान गोलंदाज), दोन फिरकी गोलंदाज आणि चार वेगवान गोलंदाज ठेवले असतील तर, हे थोडे धोक्याचं ठरू शकतं. पण भारत दोन वेगवान गोलंदाज आणि एक अष्टपैलू खेळाडू (हार्दिक पांड्या) आणि दोन फिरकीपटूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा विचार करत आहे.”ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर तुमच्या संघात तीन वेगवान गोलंदाज असणं आवश्यक आहे. पर्थच्या खेळपट्टीवर तुमच्या संघात चार वेगवान गोलंदाज असणं गरजेचं आहे. टी-20 विश्वचषकात भारतानं विचारपूर्वक संघाची निवड केली असेल, पण फक्त चार गोलंदाजांचं संघात समावेश करणे, संघासाठी धातक ठरण्याची शक्यता आहे.”

टी-20 विश्वचषकासाठी भारताचा संघ- 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, यूजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भूवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखीव खेळाडू- मोहम्मद शमी, दीपक चाहर, रवी बिश्नोई आणि श्रेयस अय्यर.

हे देखील वाचा-Related posts